शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

बाथरुममध्ये जास्त वेळ घालवताय, तुम्हालाही होईल ‘गिझर सिंड्रोम’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 10:05 PM

एका २५ वर्षाच्या तरुणाला घरी आंघोळ करत असताना अचानक डोळ्यांसमोर अंधार येऊन चक्कर आली. त्याला त्वरित मुलुंड येथील रुग्णालयात नेण्यात आले.

 मुंबई - एका २५ वर्षाच्या तरुणाला घरी आंघोळ करत असताना अचानक डोळ्यांसमोर अंधार येऊन चक्कर आली. त्याला त्वरित मुलुंड येथील रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय उपचार घेतल्यामुळे दीर्घकाळानंतर तो या आजारातून बरा होऊ शकला. उपचारादरम्यान रुग्णालयातील डॉक्टरांच्या लक्षात आले की, त्याला लूज स्टूल्सचा सुद्धा त्रास होता. सततच्या गिझर वापराच्या सवयीमुळे सध्या ‘गिझर सिंड्रोम’ हा नवा आजार डोके वर काढतो आहे, त्यामुळे बाथरुममध्ये अधिक वेळ घालवणाºयांनी वेळीच काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.‘गिझर सिंड्रोम’ हा आजार बाथरुममध्ये अधिक काळ घालवणा-या लोकांमध्ये दिसून येतो. बाथरुम्समध्ये बसवलेल्या गॅस गिझर्समधून बाहेर पडणा-या कार्बन डायआॅक्साइडच्या बाधेमुळे हा आजार होतो. गिझर सिंड्रोमचे निदान करण्यात आलेले रुग्ण २० ते ४० वर्षे वयोटातील होते. त्यांना जवळपास ३० ते ४५ मिनिटे बाथरुममध्ये राहण्याची सवय असल्याचे दिसून आले. चक्कर येणे, बेशुद्ध होणे आणि डोळ्यांसमोर अंधार येणे ही सिंड्रोमची लक्षणे आहेत. हा आजार दीर्घकाळापर्यंत राहिल्यास व्यक्ती कोमामध्ये जाऊ शकते किंवा कार्बन डायआॅक्साइडच्या बाधेमुळे हृदयक्रिया बंद पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असे डॉ. संदीप गोरे यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांत १२ रुग्ण या आजाराचे बळी ठरल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. डॉ. गोरे यांनी सांगितले की, बाथरुममध्ये दीर्घकाळार्यंत राहण्याच्या सवयीमुळे एपीलेप्सीने पीडित २५ वषार्ची महिला आणि पार्किसन्स आजाराने पीडित ३१ वषार्ची महिला यांच्या केसेस आल्या होत्या. उपचारानंतर त्या सामान्य जीवन जगत आहेत. या आजाराचे इतर परिणाम जाणून घेण्यासाठी 'ब्लड-गॅस अ‍ॅनालिसिस' व इतर सामान्य चाचण्या केल्या जातात. या केसेससंदर्भात ईआर फिजिशियन्स व न्यूरोलॉजिस्ट्स आॅक्सिजन थेरेपीसह उपचार करतात. पण वेळेवर व योग्य उपचार केले नाही तर परिस्थिती जीवघेणी होऊ शकते किंवा दीर्घकाळापर्यंत आजाराचे साइड इफेक्ट्स दिसू शकतात.  या समस्येच्या हाताळणीबाबत बोलताना डॉ. गोरे म्हणाले, घरातील साधी उपकरणे योग्यरित्या वापरली नाही आणि योग्य ती काळजी घेतली नाही, तर ते अत्यंत धोकादायक ठरू शकते आणि त्याचा हृदय, श्वसन प्रक्रियेवर आणि मज्जासंस्थेवर दुष्परिणाम होऊ शकतो. अनेक लोकांना, तसेच डॉक्टर्सना देखील या आजाराबाबत माहीत नाही. हा धोका टाळण्यासाठी बाथरुम्समध्ये पुरेशा प्रमाणात हवा खेळती ठेवणे, हाच मूलभूत उपाय आहे.   

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या