शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘तू अभ्यासाकडे लक्ष दे, टेन्शन घेऊ नकोस’, मुख्यमंत्र्यांचा त्या मुलाला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 09:42 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाला सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : महिन्याच्या सात तारखेपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे होणारे वेतन मागील काही महिन्यांपासून उशिराने होत आहेत. याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच कुटुंबातील लहान चिमुकल्यांवरसुद्धा होत आहे. अशाच एका एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने आपल्या कुटुंबीयांच्या वेदना मांडत चक्क मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांची सभास्थळी भेट घेत त्यांना पत्र दिले. यावेळी, ‘तू अभ्यासाकडे लक्ष दे, टेन्शन घेऊ नकोस’ असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी त्या विद्यार्थ्याला दिला. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन लवकरात लवकर करण्याचे आश्वासनही दिले. 

एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपानंतर व  सत्ताबदल झाल्यानंतरही  कर्मचाऱ्यांना १५ तारीख उलटूनही वेतन मिळत नाही. या पार्श्वभूमीवर एसटी आगारात वाहक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मुलगा तेजस याने चक्कीनाका परिसरात मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेच्या ठिकाणी त्यांची भेट घेतली.

पत्राद्वारे मांडल्या व्यथातेजस शाळेतून परस्पर सभेच्या ठिकाणी गेला. त्यावेळी त्याला जे सुचले ते त्याने एका कागदावर लिहीत तो कागद मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला, अशी माहिती तेजसच्या वडीलांनी लोकमतला दिली. 

एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने आपल्या वेदना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी त्याचे मनोबल वाढविले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्री