तुम्हीही बनू शकता प्रिन्सेस आॅफ ठाणेकर

By Admin | Updated: October 4, 2016 02:32 IST2016-10-04T02:32:42+5:302016-10-04T02:32:42+5:30

ठाणेकर युवतींसाठी लोकमत युवा नेक्स्ट आणि एल.टी.ए.ब्युटी अ‍ॅकॅडमी घेऊन येत आहे व्यक्तिमत्त्व व सौंदर्य स्पर्धा. ज्याचे नाव आहे

You can also become Princess of Thanekar | तुम्हीही बनू शकता प्रिन्सेस आॅफ ठाणेकर

तुम्हीही बनू शकता प्रिन्सेस आॅफ ठाणेकर

ठाणे : ठाणेकर युवतींसाठी लोकमत युवा नेक्स्ट आणि एल.टी.ए.ब्युटी अ‍ॅकॅडमी घेऊन येत आहे व्यक्तिमत्त्व व सौंदर्य स्पर्धा. ज्याचे नाव आहे प्रिन्सेस आॅफ ठाणेकर.
अशी होईल आॅडीशन
फॉर्म्स भरून तुम्ही एल.टी.ए मध्ये ४ ते ८ आॅक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते ४ या वेळेत जायचे आहे. तिथे आॅडिशन टेस्टमध्ये निवडून आलेल्या युवतींना १२ आॅक्टोबर रोजी कोरम मॉल, ठाणे(प.) येथे होणाऱ्या अंतिम फेरीत सहभागी होता येईल.
विशेष स्पर्धा
ज्या युवतींना नेल आर्ट आणि मेकअप्मध्ये करिअर करायचे त्यांच्यासाठी ३ ते ७ आॅक्टोबर दरम्यान एल.टी.ए मध्ये फॅन्टासी नेल आर्ट आणि फॅन्टासी मेकअप सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ९ आॅक्टोबर रोजी नैपुण्य स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेला कोरम मॉल, ठाणे, हॅथवे केबल, केबल इन, जश्न, फ्युजन बीटस्, वूड क्राफ्ट यांचे सहकार्य लाभले आहे. अधिक माहितीसाठी ९८६७१६२९०१ या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तसेच ७७३८८७७२२४ या क्रमांकावर संपर्क आणि व्हॉटस्अ‍ॅपही करू शकता.
तुमच्याकडे आत्मविश्वास आहे आणि तुम्ही स्वत:ला प्रूव्ह करू इच्छित असाल तर १८ वर्षावरील युवतींसाठी ही संधी आम्ही घेऊन येत आहोत.
तुम्हाला आमच्या फ्लोट अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचा असेल तर तिथेच एन्ट्री फॉर्म्सही मिळू शकतील.
किंवा आमच्या या बातमीत दिलेल्या मोबाइल नंबरवर तुम्ही तुमचेच नाव नोंदवू शकता. स्पर्धा जिंकणाऱ्या प्रिन्सेसला मिळणार एल.टी.ए ची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसीडर होण्याची संधी.

Web Title: You can also become Princess of Thanekar