शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

तुम्ही नगरसेवक पाखंडी आहात - आयुक्तांनी सुनावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 6:27 AM

घनकचरा व्यवस्थापन कर ५० टक्के घेण्यावर स्थायी समितीत सहमती दाखवणाºया पक्षांनी घूमजाव केल्याने आणि नगरसेवकांनी शुक्रवारच्या महासभेत यू टर्न घेतल्याने ही करवाढ फेटाळण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी नगरसेवकांवर तुम्ही पाखंडी आहात, असा आरोप केला.

उल्हासनगर - घनकचरा व्यवस्थापन कर ५० टक्के घेण्यावर स्थायी समितीत सहमती दाखवणाºया पक्षांनी घूमजाव केल्याने आणि नगरसेवकांनी शुक्रवारच्या महासभेत यू टर्न घेतल्याने ही करवाढ फेटाळण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी नगरसेवकांवर तुम्ही पाखंडी आहात, असा आरोप केला. माझ्याविरोधात कुठली कारवाई करायची ती करा, असे खुले आव्हान त्यांनी नगरसेवकांना दिले.घनकचरा व्यवस्थापन शुल्क आकारण्याच्या प्रस्तावावर महासभेत चर्चा झाली आणि तो नगरसेवकांनी फेटाळला. हा जिझिया कर असल्याचे मत शिवसेनेचे अरूण अशांत, सुनील सुर्वे, राजेंद्र चौधरी यांनी व्यक्त केले. तर भाजपाचे नगसेवक प्रकाश नाथानी यांनी ३ वर्षात महापालिकेने कोणत्या प्रभागात मूलभूत कामे केली, त्यांची माहिती द्या. त्यानंतरच कर आकारा, असे सांगितले.महापालिकेचे उत्पन्न मर्यादित आहे. खर्च व उत्पन्नातील तूट दिवसेंदिवस वाढत आहे. घनकचरा व्यवस्थापन कर लावला नाहीतर मूलभूत सेवांव्यतीरिक्त इतर कामे होणार नाहीत, असा इशारा देत तुम्हाला जी कारवाई करायची ती करा, असे आयुक्तांनी ठणकावले.अर्थसंकल्पातील काढली हवाआयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी महापालिका अर्थसंकल्पावरच प्रश्नचिन्ह उभे केले. उत्पन्न व खर्चात ताळमेळ नसलेला अर्थसंकल्प आजपर्यंत बनवला जात असल्याचे सांगितले.२०१४-१५ चा अर्थसंकल्प ५५० कोटीचा, प्रत्यक्षात उत्पन्न २९० कोटी. २०१५-१६ चा अर्थसंकल्प ६०० कोटीपेक्षा जास्त, मात्र उत्पन्न ३२१ कोटी, २०१६-१७ चा अर्थसंकल्प ६६४ कोटी, तर उत्पन्न ३८० कोटीचे आहे. उत्पन्न व खर्चात निम्या पेक्षा जास्त फरक असून महापालिकेचे खरे उत्पन्न १३० कोटी तर सरकारचे अनुदान २५० कोटी असे एकूण ३८० कोटीचा खरा अर्थसंकल्प आहे, अशी आकडेवारी सादर करत आयुक्तांनी गेल्या तीन वर्षातील अर्थसंकल्पाची हवाच काढून टाकली.भदाणेंची पदोन्नती अमान्यमहापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या पदोन्नतीचा विषय महासभेत आला. भाजपा व ओमी टीमचे नगरसेवक उपस्थित होते. रिपाइंचे गटनेते भगवान भालेराव यांनी भदाणे यांना महापालिकेने काढून टाकले आहे, ते न्यायालयाच्या स्थगित आदेशावर आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल असून चौकशी सुरू आहे, असा मुद्दा मांडला. यावरून आयुक्त व भालेराव यांच्यात वाद झाला आणि आयुक्त रागाच्या भरात सभागृहाबाहेर पडले. मागोमाग अन्य अधिकारीही गेले. त्यानंतर महासभेने भदाणे यांचा विषय अमान्य करत अन्य तिघांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर