पालिकेच्या उफरट्या कारभराचा फटका

By Admin | Updated: November 17, 2016 07:11 IST2016-11-17T07:11:35+5:302016-11-17T07:11:35+5:30

शहरातील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम दीर्घकाळ रखडल्याने आधीच सर्वत्र धुळीचे साम्राज्य परसले आहे.

The wreckage of the municipality | पालिकेच्या उफरट्या कारभराचा फटका

पालिकेच्या उफरट्या कारभराचा फटका

डोंबिवली : शहरातील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम दीर्घकाळ रखडल्याने आधीच सर्वत्र धुळीचे साम्राज्य परसले आहे. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने धूर आणि आवाजाच्या प्रदूषणाने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच आता काँक्रिटच्या रस्त्यांशेजारचे रस्ते पुन्हा खोदण्यास सुरूवात केल्याने काम झालेल्या रस्त्यांतही खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्या ठिकाणचे फुटपाथ तोडून तेथे गटारे बांधण्याचा द्रविडी प्राणायाम सुरू आहे.
मानपाडा रोडनजीक टाटा पॉवरलाइनजवळील रस्त्यानजीकचे फुटपाथ नव्याने खोदले आहेत. त्यामुळे नागरिकांना चार रस्त्याच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढणे जिकीरीचे झाले आहे. चारचाकींसह दुचाकी आणि मोठ्या वाहनांमधून वाट काढतांना अडथळयाची शर्यत पार पाडावी लागते आहे. ज्येष्ठांसह विद्यार्थ्यांचाही त्याचा त्रास होत असून वाहनचालकही त्रस्त आहेत.
आधी जेथे सीसी रोडचे काम केले त्याचवेळी गटारीची कामे का केली गेली नाहीत, असा सवाल संतप्त नागरिकांनी ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना विचारला. पण ते निरुत्तर झाले. पुढील तीन महिने ही कामे अशीच सुरू राहणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The wreckage of the municipality