शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

उठाव केला नसता तर सत्ता आली नसती: नरेश म्हस्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 14:33 IST

लॉटरी कोणाला लागली ते त्यांनी ठरवावे याचीही आठवण त्यांनी नाईक यांना करून दिली. 

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: लॉटरी कोणाला लागली? याचे आत्मपरीक्षण गणेश नाईक यांनी करावे. काही नाही साठी बुद्धी नाठी असं म्हणतात, त्यांचे वय झाले आहे, त्यामुळे ते काय बोलतात हे त्यांनाच माहीत अशी टीका खासदार नरेश म्हस्के यांनी केली. जर एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता तर आता सत्ता आली नसती, त्यामुळे लॉटरी कोणाला लागली ते त्यांनी ठरवावे याचीही आठवण त्यांनी नाईक यांना करून दिली. 

पालघर येथे स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना लॉटरी म्हणून ते मुख्यमंत्री झाले असल्याचे सांगितले. परंतु त्यांना ते टिकविता आले नाही नसल्याची टीका केली होती. यानंतर पुन्हा शिंदे सेना आणि भाजपचे गणेश नाईक यांच्यातील कटुता पुन्हा एकदा समोर आली आहे. शिंदे सेनेकडून सध्या नवी मुंबईत नाईक यांच्या विरोधात कुरघोडी वाढली आहे. त्यामुळे नाईक सध्या त्रस्त आहेत. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा ते शिंदे सेनेचा खरपूस समाचार घेत आहेत.

अशातच त्यांनी पालघर मध्ये शिंदे यांच्यावर टीका करीत तोंड सुख घेतले. त्यानंतर ठाण्यात शनिवारी खासदार म्हस्के यांनी पलटवार केला आहे. एकनाथ शिंदे हे सतत जिंकत आलेले आहेत, मात्र नाईक यांचा पराभव झाला आहे. आता ते पुन्हा निवडून आले आहेत. मात्र शिंदे यांनी उठाव केला नसता तर आज सत्ता सुद्धा आली नसती याची आठवण त्यांनी नाईक यांना करून दिली. 

मनाची हंडी

ही मानाची हंडी आहे, इथून हंडीला सुरुवात झाली, ही पहिली हंडी जी दूरदर्शनवर दाखवली गेली, ही हंडी आनंद दिघे यांनी सुरू केली होती, आता एकनाथ शिंदे ही परंपरा चालवत आहेत.

टॅग्स :naresh mhaskeनरेश म्हस्केShiv Senaशिवसेना