शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

‘सृजन ट्युन’ ही श्रमिक कलावंतच बनवू शकतात, मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:00 IST

   ठाण्यात मोठ्या नेतृत्वाची परंपरा आहे. रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे यांच्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात हा कार्यक्रम होत आहे याचा आनंद आहे, अशा भावनाही शेलार यांनी व्यक्त केल्या. 

ठाणे : कितीही डॉलर खर्च केले तरी श्रमिक कलावंतांची कला निर्माण होऊ शकत नाही. ही कला वृद्धिंगत झाली पाहिजे. ती पुढच्या पिढीपर्यंत नेली पाहिजे. सध्या चॅट जीपीटीचा जमाना आहे. त्यात कृत्रिम ट्यून मिळते, पण सृजन ट्यून ही श्रमिक कलावंतच बनवू शकतो, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.    ठाण्यात मोठ्या नेतृत्वाची परंपरा आहे. रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे यांच्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात हा कार्यक्रम होत आहे याचा आनंद आहे, अशा भावनाही शेलार यांनी व्यक्त केल्या. 

बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे दोन दिवसीय श्रमिक कलावंतांच्या कला महोत्सवास सुरुवात झाली. त्याचे रविवारी शेलार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ते म्हणाले की, लुप्त होत चाललेल्या लोककलांचे पुनरुज्जीवन करणे आणि अन्य कलांना मानाचे स्थान दिले पाहिजे. गेल्या ८० ते ८५ दिवसांत या विभागाच्या माध्यमातून मी १७० कार्यक्रम केले. 

श्रमिक कलावंतांनी सादर केल्या कला  तृतीयपंथी, तमाशा कलावंत, गोंधळी, संबळ वादक, अंध दिव्यांग, पोतराज, वासुदेव, कोळी बांधव, तारपा कलावंत अशा शंभरहून अधिक श्रमिक कलावंतांनी कला सादर केल्या. महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी श्रमिकांची कलादिंडी काढण्यात आली होती. 

जुने ज्ञानसाधना महाविद्यालयापासून सुरू झालेली कलादिंडी बाळासाहेब ठाकरे कलादालनात विसर्जित करण्यात आली. यावेळी शेलार यांच्या हस्ते सहा श्रमिक आणि कलाविकासासाठी योगदान देणाऱ्या गुणीजनांचा सत्कार करण्यात आला.

संस्कृती संवर्धनाचा प्रचार, प्रसार संस्कृती संवर्धनाचा प्रचार, प्रसार, कलावंतांना संधी आणि स्थान देण्याचे काम या कार्यक्रमातून करत आहे. या आर्थिक वर्षात १२०० कार्यक्रमांची रचना केली आहे. यावेळी खा. नरेश म्हस्के, आ. निरंजन डावखरे, भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, संदीप लेले, सांस्कृतिक विभागाचे सहसंचालक श्रीराम पांडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपा