उल्हासनगरात इमारतीच्या टेरेसवरून पडून कामगारांचा मृत्यू

By सदानंद नाईक | Updated: June 30, 2024 15:48 IST2024-06-30T15:48:13+5:302024-06-30T15:48:26+5:30

उल्हासनगर कॅम्प नं-२, गोलमैदान येथील हिरापन्ना इमारतीच्या छतावर पत्रे टाकण्याचे काम २१ जून रोजी दीपक सरोज, दिपककुमार पंडित, शैलेशकुमार प्रसाद व गौरव विश्वकर्मा करीत होते.

Workers died after falling from the terrace of a building in Ulhasnagar | उल्हासनगरात इमारतीच्या टेरेसवरून पडून कामगारांचा मृत्यू

उल्हासनगरात इमारतीच्या टेरेसवरून पडून कामगारांचा मृत्यू

उल्हासनगर : कॅम्प नं-२, गोलमैदान येथील हिरापन्ना इमारतीच्या छतावर पत्रे लावतांना एका कामगारांचा खाली पडून मृत्यू झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. 

उल्हासनगर कॅम्प नं-२, गोलमैदान येथील हिरापन्ना इमारतीच्या छतावर पत्रे टाकण्याचे काम २१ जून रोजी दीपक सरोज, दिपककुमार पंडित, शैलेशकुमार प्रसाद व गौरव विश्वकर्मा करीत होते. पत्रा टाकण्याचे काम करीत असतांना सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही साहित्य इमारती मधील नागरिक व ठेकेदारांनी पुरविले नाही. रात्री साडे दहा वाजता दीपक सरोज याचा पाय घसरून इमारती खाली पडल्याने, त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उशिराने उल्हासनगर पोलीस ठाण्यात निलेश जयराम वधारीया व ठेकेदार सत्येंद्र प्रसाद यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Workers died after falling from the terrace of a building in Ulhasnagar