शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ठाण्यात सिमेंट मिक्सरमध्ये पडून कामगाराचा मृत्यु

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 22:19 IST

घोडबंदर रोड येथे सुरु असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी सिमेंट मिक्सरमध्ये तोल जाऊन गंभीर जखमी झालेल्या रफीकुल मिया (३२, रा. पश्चिम बंगाल) याचा मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी घडली.

ठळक मुद्देकासारवडवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युचा गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: घोडबंदर रोड येथे सुरु असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी सिमेंट मिक्सरमध्ये तोल जाऊन गंभीर जखमी झालेल्या रफीकुल मिया (३२, रा. पश्चिम बंगाल) याचा मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युचा गुन्हा दाखल ेकरण्यात आला आहे.घोडबंदर रोडवरील विहंग व्हॅलीजवळील महावीर कल्पवृक्ष कन्स्ट्रक्शन येथे काम करणारा रफीकुल मिया (सध्या रा. महावीर कल्पवृक्ष कन्स्ट्रक्शन, लेबर कॅम्प, घोडबंदर रोड, ठाणे) हा ९ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास बॅचिंग प्लान्ट (सिमेंट मिक्सर) मध्ये रेती, खडी, सिमेंटचा माल मिक्स झाला आहे किंवा नाही? हे पाहण्यासाठी सिडीवर चढून या मिक्सर मशिनचे आॅफरवर असलेले झाकण खोलून पाहत असतांना त्याचा अचानक तोल गेला. त्यामुळे तो मिक्सर मशिनच्या आॅफरमध्ये पडून त्यात फिरुन तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी या बांधकामाचे पर्यवेक्षक नितीन रंगानी यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. केसरे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात