शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

चोरी करुन ठाण्यातून राजस्थानमध्ये पसार झालेल्या कामगारास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 23:16 IST

डायघर भागातील एका कारखान्यातून ७० हजारांच्या ऐवजाची चोरी करुन राजस्थानमध्ये पसार झालेल्या सुरजित सिंग (३२, रा. सेदमपूर, जि. अलवर, उत्तरप्रदेश) या कर्मचाऱ्याला डायघर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून हा ७० हजारांचा पार्टही जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे डायघर पोलिसांची कारवाई७० हजारांचा ऐवज हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: डायघर भागातील एका कारखान्यातून ७० हजारांच्या ऐवजाची चोरी करुन राजस्थानमध्ये पसार झालेल्या सुरजित सिंग (३२, रा. सेदमपूर, जि. अलवर, उत्तरप्रदेश) या कर्मचाऱ्याला डायघर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.खर्डीतील निर्मलनगरी येथील रमेश पटेल (२९) यांच्या टोटो प्रिस्ट्रेसिंग सिस्टीम आर. एम. सी. सप्लाय या कारखान्यामध्ये काम करणारा सुरजित सिंग आणि त्याचा साथीदार पवन राजपूत (२१, रा. राजोथान)आणि अस्लम खान (३२, रा. उत्तरप्रदेश) यांनी आपसात संगनमत करुन पटेल याच्या कारखान्यातील ७० हजारांच्या एका इलेक्ट्रॉनिक पार्टची चोरी केली. हा पार्ट त्यांनी काढून ते राजस्थानमध्ये पसार झाले होते. हा प्रकार १९ मे रोजी पहाटे १ ते सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला होता. याप्रकरणी बरीच शोधाशोध घेऊनही हा ऐवज न मिळाल्याने पटेल यांनी अखेर याप्रकरणी २३ मे २०२१ रोजी चोरीची तक्रार दाखल केली होती. सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, पोलीस निरीक्षक मुजावर आणि रामचंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कापडणीस यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे राजस्थानमध्ये पसार झालेला सुरजित सिंग याचा शोध घेतला. त्याला १८ जुलै २०२१ रोजी अटक करण्यात आली असून त्याला २० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले होते. त्याची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. त्याच्या अन्य दोन साथीदारांचाही शोध घेण्यात येत आहे. मालकाने पगाराचे पैसे वेळेवर न दिल्याने त्यांनी त्याच कारखान्यातील इलेक्ट्रॉनिक पार्टची चोरी केल्याचीही कबूली पोलिसांना दिली. त्याच्याकडून हा ७० हजारांचा पार्टही जप्त करण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक