साकेत पुलाचे काम आज पूर्ण
By Admin | Updated: June 5, 2016 03:09 IST2016-06-05T03:09:58+5:302016-06-05T03:09:58+5:30
येथील मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलाच्या नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनचे काम आठवडाभरात पूर्ण झाल्यानंतर त्याच पुलावरील मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या लेनचे काम

साकेत पुलाचे काम आज पूर्ण
ठाणे : येथील मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलाच्या नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनचे काम आठवडाभरात पूर्ण झाल्यानंतर त्याच पुलावरील मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या लेनचे काम आठवडाभरात मार्गी लावण्यात येणार आहे. त्यामुळे या लेनवरील वाहतूक येत्या रविवारी सुरू करण्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत करण्यात आला आहे.
या पुलाच्या तातडीने हाती घेतलेल्या दोन्ही लेनचे काम पावसाळ्यापूर्वी म्हणजे अवघ्या १५ दिवसांत पूर्ण होणार असल्याने या पुलाचे आयुष्यमान वाढण्यास मदत झाली आहे. तसेच भविष्यात वाहतूककोंडीला तोंड द्यावे लागणार नाही. साकेत पुलावरील नाशिकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनचे काम २१ मे रोजी तातडीने सुरू झाले.
या वेळी पुलावरील अतिरिक्त डांबरी थर, जॉइंट पट्टी काढण्याबरोबर काँक्रिट फोडून तेथे नवीन स्ट्रीलच्या पट्ट्या टाकण्याचे काम हाती
घेण्यात आले. त्या वेळी त्या पुलाच्या दोन बेअरिंग गेल्याचे समोर आले. हे सर्व काम घेतलेल्या मुदतीच्या आत म्हणजे अवघ्या सात दिवसांत पूर्ण झाले. या कामासाठी वाहतूक वळवण्यात आल्याने मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या लेनचे काम तातडीने हाती घेण्याचा निर्णय घेऊन ते काम ३१ मे रोजी सुरू झाले. (प्रतिनिधी)
या लेनचे आतापर्यंत सहा जॉइंटचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित दोन जॉइंटचे काम
सुरू आहे.
डांबराचा दोन इंचांचा डीबीएमचा थर टाकून झाला असून उर्वरित
एक इंचाचा डीसी थर टाकणे बाकी आहे.
दोन जॉइंट जोडल्यावर काँक्रिटीकरण झाल्यावर डांबराचा थर टाकण्यात येणार आहे.
ही कामे रविवारी पूर्ण
होतील आणि त्याच दिवशी
ही लेनही वाहतुकीसाठी सुरू करण्यात येईल, असा
विश्वास राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.