शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

कल्याण-बदलापूर रस्त्याचे काम रखडले, खासदारांनी अधिकाऱ्यांची घेतली पालिकेत ‘शाळा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 02:08 IST

कल्याण-बदलापूर रस्त्याच्या रखडलेल्या कामांना जबाबदार असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची शुक्रवारी अंबरनाथ पालिकेत शाळा भरवण्यात आली होती.

अंबरनाथ : कल्याण-बदलापूर रस्त्याच्या रखडलेल्या कामांना जबाबदार असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची शुक्रवारी अंबरनाथ पालिकेत शाळा भरवण्यात आली होती. रस्त्याचे काम रखडण्यास जबाबदार असलेल्या अधिकाºयांची खरडपट्टी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. या बैठकीत अधिकारी आपली चूक लपवण्यासाठी दुसºया विभागाच्या अधिकाºयांकडे बोट दाखवत होते. अखेर, खासदारांनी सर्वच अधिकाºयांना आपले काम जबाबदारीने करण्याचे आणि रस्त्याच्या कामाच्या आड येणाºया समस्या सोडवण्याचे आदेश दिले.कल्याण-बदलापूर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम एमएमआरडीएकडून केले जात आहे. मात्र, या रस्त्याच्या रुंदीकरणात जमिनीखाली असलेल्या जल आणि वीजवाहिन्या स्थलांतरित करण्याचा विषय ही मुख्य समस्या झाली आहे. या वाहिन्या जोपर्यंत स्थलांतरित होत नाही, तोपर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करणे शक्य नाही. त्यातच ज्या सरकारी यंत्रणेच्या वाहिन्या रस्त्याच्या आड येत आहेत, त्या विभागातील अधिकारी आपली जबाबदारी सांभाळत नसल्याने या कामाला आणखी विलंब होत आहे.या रस्त्याच्या कामासंदर्भात येणाºया अडचणींवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी खासदार शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, अंबरनाथ नगरपालिका, जीवन प्राधिकरण, महावितरणच्या अधिकाºयांची बैठक झाली.रस्त्याच्या अडचणीत या अधिकाºयांकडून एकत्रित काम केले जात नसल्याने रस्त्याचे काम रखडल्याने ही बैठक घेण्याची वेळ आली. यावेळी सर्वच विभागांनी आपल्या समस्या मांडत बाजू मांडली. तर, या बैठकीत सर्वाधिक रोष हा एमएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर दिसत होता.जोपर्यंत जमिनीखालील विविध वाहिन्या स्थलांतरित होत नाही, तोपर्यंत काम करणे शक्य नसल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले. तसेच यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले. तो प्रस्ताव मंजूर झाल्यावर त्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाल्यावर त्याचे काम करणे शक्य होणार आहे.या समस्यांवर तोडगा काढत असताना प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून घेण्याचे आणि वाढीव प्रस्तावाला मंजुरी घेण्याचे आदेश खासदारांनी दिले. तसेच रस्त्याचे काम करताना सर्वच विभागांच्या अधिकाºयांनी आपली जबाबदारी सांभाळून सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. आता यंत्रणा कधी हालाचल करतात याकडे लक्ष लागले आहे.विनापरवानगी टाकल्या वाहिन्याकल्याण-बदलापूर रस्त्यावर ज्या वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत, त्यातील काही वाहिन्या टाकण्याची परवानगी दिलेली नाही. परवानगी नसताना वाहिन्या टाकल्याने कंत्राटदाराने त्या वाहिन्या वरच्यावर टाकल्या आहेत. त्यामुळे रस्त्यासाठी खोदकाम करणे शक्य होत नसल्याचे समोर आले आहे.परवानगीला विलंब लावू नकारस्त्याचे काम करण्यासाठी वाहतूक विभागाची परवानगी गरजेची आहे. मात्र, ती परवानगी उशिराने मिळत असल्याने कामात अडथळा येत असल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भात खासदारांनी वाहतूक विभागालाही परवानगीला विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. 

टॅग्स :thaneठाणेroad transportरस्ते वाहतूक