शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

आर्थिक तरतूद नसतानाही काढली कामे, भाईंदर महापालिका अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 22:46 IST

यंदाच्या फुगवलेल्या अंदाजपत्रकात बांधकाम विभागासाठी ३६० कोटींची तरतूद असताना कामांचा खर्च मात्र ५१२ कोटींचा होणार आहे.

धीरज परब भाईंदर : तिजोरीत पैसा नाही, आर्थिक तरतूद नाही तसेच कामांची आवश्यकता नसताना मीरा-भाईंदर महापालिका प्रशासन लोकप्रतिनिधींच्या तालावर नाचत असल्याने पालिका डबघाईच्या मार्गावर आली आहे. गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकातील तब्बल २१० कोटींची कामे एकट्या बांधकाम विभागाची सुरू असताना चालू वर्षातील तब्बल २१७ कोटींच्या कामांचे कार्यादेश देणे बाकी आहे. त्यात महासभेने आणखी ८५ कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. यंदाच्या फुगवलेल्या अंदाजपत्रकात बांधकाम विभागासाठी ३६० कोटींची तरतूद असताना कामांचा खर्च मात्र ५१२ कोटींचा होणार आहे. त्यामुळे तब्बल १५२ कोटींची तफावत पालिकेच्या माथी पडणार आहे. केवळ बांधकामच नव्हे तर पाणीपुरवठा, आरोग्य, उद्यान आदी विभागांमध्येही अशीच स्थिती आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेचे अंदाजपत्रक कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. वास्तविक, महसुली उत्पन्नाची बाब विचारात न घेता मनमानीपणे प्रशासन आणि सत्ताधारी अंदाजपत्रक वारेमाप फुगवत आहेत. निविदा आणि टक्केवारीसाठी वाटेल तशी कामे काढली जात असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. यातून पालिकेवर कर्जाचा डोंगर वाढवण्यासह नागरिकांवरही वाढीव आणि नवीन करांचा बोजा मारला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१८-१९ या आर्थिक वर्षातही मर्जीप्रमाणे बांधकाम विभागाची कामे काढण्यात आली. गेल्या वर्षात काढलेल्या कामांपैकी तब्बल २१० कोटींची कामे चालू आर्थिक वर्षात सुरू आहेत. त्यांचे पैसे अजून दिलेले नाहीत. त्यातच, सत्ताधाऱ्यांनी २०१९-२० या आर्थिक वर्षात अंदाजपत्रक फुगवून बांधकाम विभागासाठी तब्बल ३६० कोटींची तरतूद केली आहे. परंतु, गेल्या आर्थिक वर्षात सुरू असलेल्या २१० कोटींच्या कामांचे देयक यंदाच्या आर्थिक तरतुदीतून द्यावे लागणार आहे. त्यामुळे तरतुदीनुसार केवळ दीडशे कोटीच खर्चासाठी शिल्लक राहणार आहेत. त्यातच, चालू वर्षात तब्बल २१७ कोटींच्या मंजूर कामांचे कार्यादेश द्यायचे आहेत. ही कामे सुरू झाली की, त्यांचे देयकही द्यावे लागणार आहे. २१७ कोटींच्या कामांचा विचार केला, तर तरतुदीनुसार तब्बल ६७ कोटींची रक्कम कमी पडणार आहे. त्यात कहर म्हणजे महासभेने आणखी ८५ कोटींची कामे मंजूर करून ठेवली आहेत. यामुळे आर्थिक तरतूद व कामे सुरू केल्याच्या तफावतीची रक्कम १५२ कोटींवर पोहोचणार आहे.

उत्पन्न कमी व कामांसाठी अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद नसताना तसेच इतका निधी महापालिकेला उभारणे शक्य नसतानाही लोकप्रतिनिधींनी मनमानीपणे अवास्तव कामे काढली आहेत. महापालिका आयुक्तांसह प्रशासनानेही सत्ताधाऱ्यांसमोर नांगी टाकत त्यांच्या तालावर ठेका धरला आहे. यातून महापालिका नियमांसह कायदे आणि सरकारी आदेशांचेही सर्रास उल्लंघन होत आहे. इतकी मोठी आर्थिक असमानता एकट्या बांधकाम विभागातच आहे. याशिवाय पाणीपुरवठा, उद्यान, आरोग्य आदी विभागांमध्येही गेल्या वर्षातील थकीत कामांची देणी आणि चालू आर्थिक वर्षात तरतुदींची असलेली कामे महापालिकेच्या मुळावर उठली आहेत.पालिका तिजोरीची वस्तुस्थिती आणि सरकारी आदेश व नियमातील तरतुदी पाहूनच आपण कामे करणार आहोत. पालिकेचे आर्थिक अहित होऊ देणार नाही. - बालाजी खतगावकर, आयुक्त

आयुक्तपदी बालाजी खतगावकर आल्यापासून नियमबाह्य कामांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. मुळात अंदाजपत्रक फुगवलेले आहे. त्यामुळे पैसा नसला तरी तरतुदीनुसार कामे काढून कर्जाचा बोजा वाढवून पालिका खड्ड्यात घालण्याचा हा प्रकार आहे. - संजय पांगे, माजी नगरसेवक

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक