शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Women's Day Special: मेहनतीने तिने फुलवला भाजीपाल्याचा मळा; महिलांचाही शेतीकडे ओढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 00:29 IST

दोन एकरांत घेतले विविध उत्पादन, जांभा नदीच्या पाण्याचा केला वापर

जनार्दन भेरे भातसानगर : शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादित केला जात असला, तरी या शेतीच्या उत्पादनात महिलांचाही तितकाच वाटा आहे हेही तितकेच सत्य आहे. दिवसरात्र एक करून आपले भविष्य बदलून टाकण्याची किमया एका महिलेने केली आहे. नडगाव येथील सुरेखा सुरेश फर्डे यांच्या घरची परिस्थिती बेताची; पण त्यावर मात करण्यासाठी मेहनत करण्याची तिची तयारी होती.

शेतीजवळून जांभा नदी वाहत असल्याने त्याचा फायदा घेत आपल्या या जागेत भाजीपाला उत्पादन घेण्याचे ठरविले. पतीच्या बरोबरीने शेतीच्या कामाला सुरु वात केली. शेतात पाणी आणले आणि ठिबक सिंचन पद्धतीचा उपयोग करून आपल्या शेतात काकडी, भोपळा, शिरोळे, कारली, दुधी आणि डांगर यांची लागवड केली. मागील तीन वर्षांपासून त्या मेहनत घेऊन त्यांनी आपल्या घराला स्थैर्य प्राप्त करून दिले. पती सुरेश यांनीही, आपल्या यशात पत्नीचाच अधिक वाटा असून तिच्या दिवसरात्र मेहनतीमुळे मलाही अधिक काम करण्याची ऊर्जा मिळते, असे सांगितले.

दोन एकरमध्ये ४०० किलो काकडी, ५०० किलो कारली, २०० किलो भोपळा, २०० किलो शिरोळे, १५० किलो दुधी आणि महत्त्वपूर्ण अशी डांगराची लागवड केली असल्याने अधिक फायदा होतो. दरवर्षी अशा प्रकारच्या भाजीपाल्याची शेती केल्याने होणाऱ्या फायद्यामुळे घराची घडी बदलण्यास मदत झाली आहे.यामुळे आम्ही समाधानी आहोत असे त्या म्हणाल्या.ठिबक सिंचनाने केली लागवडशेतात ठिबक सिंचनाच्या मदतीने लागवड केली असून, त्याला सेंद्रिय खतांची जोड दिल्याने आज भाजीपाला जोराने बहरला आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत अधिक फायदा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. आज शेती करण्याच्या प्रमाणात घट होत असल्याचे दिसत आहे. शेती करणे परवडत नाही, अशीच ओरड होते. मात्र, शेतीत अनेक प्रकारचे उत्पादन घेतल्यास नक्कीच फायदा होतो, हे सुरेखा यांनी दाखवून दिले आहे.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिन