शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
4
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
7
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
8
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
9
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
10
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
11
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
12
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
13
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
14
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
15
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
16
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
17
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
18
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
19
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
20
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?

मुख्यालयातील शौचालयाच्या दुरुस्तीच्या मुद्यावरुन महिला नगरसेविकांचा प्रशासनावर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 17:15 IST

महापालिका मुख्यालयातील महिला शौचालयाची दुरावस्था झाल्याचा मुद्दा मंगळवारी झालेल्या महासभेत चांगलाच गाजला. जो पर्यंत शौचालयाची दुरुस्ती होत नाही, तो पर्यंत महासभेवर बहिष्कार घालण्याचा इशारा देत सर्व पक्षीय नगरसेविकांनी प्रशासनावर हल्लाबोल केला.

ठळक मुद्देमुख्यायलासह शहरातील महिला शौचालयांची अवस्था दयनीयशौचालयाची दुरुस्ती झाली तरच होणार पुढील महासभामहापौरांनी दिला प्रशासनाला इशारा

ठाणे - एकीकडे ठाणे शहर स्मार्टसिटीकडे वाटचाल करीत आहे. तसेच हगणदारीमुक्तीसाठी महापालिका विविध योजना हाती घेत आहे. परंतु महापालिका मुख्यालयात महासभेच्या सभागृहाबाहेर असलेले महिलांसाठीच्या शौचालयाची दैना झाल्याची बाब मंगळवारी झालेल्या महासभेत उघड झाली. केवळ मुख्यालयातीलच नाही तर, शहराच्या झोपडपट्टी भागातील महिला शौचालयांची अवस्था देखील दयनीय असल्याचा गौप्यस्फोट करीत सर्वपक्षीय नगरसेविका महासभेत आक्रमक झाल्या होत्या. त्यानुसार मुख्यालयातील शौचालय दुरुस्त होत नसेल तर पुढील महासभेवर बहिष्कार टाकू असा इशारा नगरसेविकांनी दिला. पिठासीन अधिकारी तथा प्रभारी महापौर रमाकांत मढवी यांनी मुख्यालयातील शौचालयाची दुरुस्ती झाली नाही तर पुढील महासभा होणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.मंगळवारी झालेल्या महासभेत, महापालिका क्षेत्रात बांधण्यात येणाऱ्या  वैयक्तीक शौचालयांची व सार्वजनिक शौचालयांची जोडणी मलनिसारण व्यवस्थेत करण्याकरीता मलवाहीनी टाकणे बाबतचा प्रशासकीय व वित्तीय मान्यतेचा प्रस्ताव पटलावर मंजुरीसाठी आला होता. या अनुषंगाने शिवसेनेच्या नगरसेविका परिषा सरनाईक यांनी आपण स्मार्ट सिटीचा गवगवा करीत आहोत, हगणदारीमुक्तीसाठी विविध पावले उचलत आहोत. परंतु मुख्यालयातील महिला शौचालयाची अवस्था अतिशय दयनीय असल्याची बाब त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. महिन्यातून एकदा महासभेसाठी आम्ही येथे दिवसभर सभागृहात बसून असतो. परंतु येथील शौचालयाची अवस्था अतिशय वाईट असल्याचे त्यांनी सांगितले. तर मीनल संख्ये यांनी देखील त्यांच्या प्रभागातील महिला शौचालयांची अवस्थेचा पाढा वाचला. एका मागून एक नगरसेविकांनी अशा पध्दतीने महिला शौचालयांचा पाढा वाचत जो पर्यंत मुख्यालयातील शौचालयाची अवस्था सुधारत नाही तो पर्यंत महासभेवर बहिष्कार टाकला जाईल असा इशारा देत, सर्व पक्षीय नगरेसेविका एकवटल्या आणि त्यांनी उभे राहून प्रशासनावर हल्लाबोल केला. तर, पिठीसीन अधिकारी तथा प्रभारी महापौर रमाकांत मढवी यांनी महिला नगरसेविकांचे म्हणने रास्त असल्याचे सांगत पुढील महासभेपर्यंत शौचालयाची दुरुस्ती झाली नाही तर महासभा होणार नसल्याचा इशारा दिला. त्यानुसार प्रशासनाने देखील शौचालयाच्या दुरुस्तीचे आश्वासन दिले.

  • दिव्यातील शौचालयाचा पाढा वाचतांना राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबाजी पाटील यांनी येथील शौचालयांना दरवाजेच नसल्याचे सांगितले. त्यामुळे एखाद्याला शौचालयात थांबायचे असेल तर त्याला गाणे म्हणन्याशिवाय पर्यायच नसल्याचे सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcommissionerआयुक्त