लोकलवर दगड भिरकावणारी महिला गजाआड

By Admin | Updated: February 12, 2017 02:02 IST2017-02-12T02:02:39+5:302017-02-12T02:02:39+5:30

धावत्या लोकलवर दगड आणि बाटली भिरकावणाऱ्या वृद्ध महिलेला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. ही महिला ६२ वर्षीय असून, तिने भिरकावलेल्या दगड आणि

Women throwing stones on the locks | लोकलवर दगड भिरकावणारी महिला गजाआड

लोकलवर दगड भिरकावणारी महिला गजाआड

ठाणे : धावत्या लोकलवर दगड आणि बाटली भिरकावणाऱ्या वृद्ध महिलेला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. ही महिला ६२ वर्षीय असून, तिने भिरकावलेल्या दगड आणि बाटलीने चार महिला किरकोळ जखमी झाल्या. अटकेतील महिला मनोरुग्ण असल्याचे तपासात पुढे आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्या महिलेला उपचारार्थ ठाण्याच्या मनोरुग्णालयात दाखल केल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली.
सीएसटी - कल्याण फास्ट लोकलने महिलांच्या सीएसटी बाजूकडील राखीव डब्यातून श्वेता सावरेकर या ८ फेब्रुवारी रोजी रात्री ८.२० वा.च्या सुमारास प्रवास करीत होत्या. लोकल मुंब्रा पारसिक बोगदा पास करीत असताना अनोळखी व्यक्तींकडून डब्यावर दगड व काच फेकून मारण्यात आली. यामध्ये सावरेकर यांच्यासह सहप्रवास करणाऱ्या वैशाली जोगदंड,
ज्योत्स्ना राणे आणि अर्चना पांचाळ अशा चौघी किरकोळ जखमी झाल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Women throwing stones on the locks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.