शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

  महिला कॉन्स्टेबल आत्महत्या प्रकरण : अखेर एसीपी निपुंगेंचा अटकपूर्व जामीनही ठाणे न्यायालयाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 22:27 IST

ठाणे, दि. २५ - महिला पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी कथित आरोपी सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस.बी. निपुंगे यांचा जामीनअर्ज सोमवारी अखेर जिल्हा सत्र न्यायाधीश आर.एन. बावनकर यांनी फेटाळला. त्यामुळे निपुंगेंना अटक करण्याचा पोलिसांचा मार्गही मोकळा झाला आहे.पवार आत्महत्या प्रकरणात एसीपींविरुद्ध परिस्थितीजन्य तसेच प्रथमदर्शनी पुरावे आहेत. तिला त्यांनी जवळपास १११ ...

ठाणे, दि. २५ - महिला पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी कथित आरोपी सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस.बी. निपुंगे यांचा जामीनअर्ज सोमवारी अखेर जिल्हा सत्र न्यायाधीश आर.एन. बावनकर यांनी फेटाळला. त्यामुळे निपुंगेंना अटक करण्याचा पोलिसांचा मार्गही मोकळा झाला आहे.पवार आत्महत्या प्रकरणात एसीपींविरुद्ध परिस्थितीजन्य तसेच प्रथमदर्शनी पुरावे आहेत. तिला त्यांनी जवळपास १११ कॉल्स केल्याचेही सीडीआर रेकॉर्ड मिळाले आहे. ज्या दिवशी तिने आत्महत्या केली, त्या दिवशीही त्यांनी तिला वारंवार फोन केले. जुलै २०१७ पासून ते तिचा मानसिक छळ करत होते. याबाबत, तिने वाग्दत्त पतीलाही माहिती दिली. याच माहितीच्या आधारावर तिच्या भावाने कळवा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत एसीपी निपुेंगेचे नाव घेतले आहे. कॉन्स्टेबलनंतर अनेक अधिकारी असतानाही थेट एसीपींनी तिला वारंवार संपर्क करण्याचे कारण स्पष्ट होत नाही. याशिवाय, तिने गळफास घेतला, त्या वेळी ते तिच्या घराजवळच होते. अशा अनेक बाबी पोलिसांच्या वतीने सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी निदर्शनास आणून दिल्या. या संपूर्ण चौकशीसाठी त्यांची पोलीस कोठडी गरजेची असून त्यांचा मोबाइलही जप्त करण्याची परवानगी मागितली. त्यावर, निपुंगे यांचा या आत्महत्येशी संबंध नाही. पण, चौकशीसाठी ते पोलिसांना संपूर्णपणे चौकशी करतील. त्यामुळे कोठडीऐवजी त्यांना रोज पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यात यावी. तसेच त्यांचा मोबाइलही ते द्यायला तयार आहेत. परंतु, त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा, अशी बाजू आरोपीच्या वतीने अ‍ॅड. धोत्रे यांनी न्यायालयापुढे मांडली. उभय पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर सोमवारी न्यायालयाने निपुंगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. काय होऊ शकते...ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने निपुंगेंचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वीच फेटाळला होता. आता अटकपूर्व जामीन अर्जही उभय पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर फेटाळला. यामुळे त्यांना उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी दाद मागावी लागेल. त्या काळात पोलीस त्यांना कोणत्याही क्षणी अटक करू शकतात, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

टॅग्स :Courtन्यायालयCrimeगुन्हाPoliceपोलिस