महिला पोलिसाची अ‍ॅसिड पिऊन आत्महत्या

By Admin | Updated: July 21, 2015 01:28 IST2015-07-21T01:28:25+5:302015-07-21T01:28:25+5:30

ठाणे पोलीस मुख्यालयात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या शैला धांडे हिने येथील राहत्या घरी अ‍ॅसिड पिऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली

Women commit suicide after drinking acid acid | महिला पोलिसाची अ‍ॅसिड पिऊन आत्महत्या

महिला पोलिसाची अ‍ॅसिड पिऊन आत्महत्या

कल्याण : ठाणे पोलीस मुख्यालयात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या शैला धांडे हिने येथील राहत्या घरी अ‍ॅसिड पिऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. पतीच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप शैलाचे वडील विष्णू खाडे यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पतीसह नणंदेवर गुन्हा दाखल झाला आहे.
कल्याण पूर्वेकडील विजयनगर परिसरातील श्रीकृष्ण सोसायटीत राहणाऱ्या शैलाचे महिनाभरापूर्वीच पांडुरंग याच्याशी विवाह झाला होता. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तिने अ‍ॅसिड प्राशन केले. परिणामी, प्रकृती बिघडल्याने पतीने तिला उपचारार्थ नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, दुपारी साडेचारच्या सुमारास तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, लग्नात तुझ्या वडिलांनी छोटी अंगठी केली. चांगले कपडे केले नाहीत. घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आण, असा तगादा लावून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जायचा, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.

Web Title: Women commit suicide after drinking acid acid