धान्य मिळवून देण्याच्या नावाखाली महिलेचे दागिने लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:56 IST2021-02-26T04:56:09+5:302021-02-26T04:56:09+5:30
ठाणे : धान्य मिळवून देण्याच्या नावाखाली वनिता करले (वय ६२, रा. आनंदनगर, कोपरी, ठाणे) हिचे सोन्याच्या बोरमाळेसह ४० हजारांचे ...

धान्य मिळवून देण्याच्या नावाखाली महिलेचे दागिने लुबाडले
ठाणे : धान्य मिळवून देण्याच्या नावाखाली वनिता करले (वय ६२, रा. आनंदनगर, कोपरी, ठाणे) हिचे सोन्याच्या बोरमाळेसह ४० हजारांचे दागिने दोन भामट्यांनी लांबविल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
आनंदनगर येथे राहणाऱ्या वनिता या २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी जात होत्या. त्या आनंदनगर येथील सेवारस्त्यावर आल्या असता दोन अनोळखी भामट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतविले. ‘आई, तुम्हाला धान्य मिळवून देतो, गरिब दिसावे म्हणून तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पाकिटात ठेवा’ आणि पाकीट पर्समध्ये ठेवण्याचा बहाणा करीत त्यांनी २० हजारांची बोरमाळ आणि २० हजारांची अन्य एक माळ अशा ४० हजारांचा ऐवज फसवणुकीने घेऊन त्यांनी पलायन केले. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुझा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक काटेला हे अधिक तपास करीत आहेत.