पाणी टंचाईमुळे महिलेचा हात फॅक्चर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:40 IST2021-09-19T04:40:42+5:302021-09-19T04:40:42+5:30

कल्याण : डोंबिवली पूर्व भागातील भोपर देसलेपाड्यात साईराज इमारतीला गेल्या चार महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होतोय. त्यामुळे या इमारतीमधील ...

Woman's hand fractured due to water scarcity | पाणी टंचाईमुळे महिलेचा हात फॅक्चर

पाणी टंचाईमुळे महिलेचा हात फॅक्चर

कल्याण : डोंबिवली पूर्व भागातील भोपर देसलेपाड्यात साईराज इमारतीला गेल्या चार महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होतोय. त्यामुळे या इमारतीमधील महिलांना टँकर आल्यावर खालून पाणी भरावे लागत आहे. स्नेहा भैसाणे ही महिला पाण्याचा हंडा चौथ्या मजल्यावर नेत असताना पाय घसरुन पडल्याने त्यांचा हात फ्रॅक्चर झाला.

ऑर्चिड इमारतात राहणाऱ्या भैसाणे या अगोदर कामाला जात होत्या. लॉकडाऊनमुळे त्यांची नोकरी गेली. त्यांचे पती एक लहानसा व्यवसाय करतात. त्यांच्या इमारतीस गेल्या चार महिन्यांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. पाच दिवसांपूर्वी त्यांच्या इमारतीत टँकरने पाणी मागविण्यात आले. चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या स्नेहा पाण्याचा भरलेला हंडा चौथ्या मजल्यावर नेत असताना त्यांचा तोल गेला त्या खाली पडल्या. त्यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला. खासगी टँकर मागविण्यावर खर्च करावा लागतो. त्यात स्नेहा यांचा हात फ्रॅक्चर झाल्याने उपचार करण्यासाठी त्यांना आतापर्यंत तीन हजारांपेक्षा जास्त खर्च आला. पाणी समस्या सोडविण्याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याची तक्रार सोसायटीतील नागरिकांनी केली.

फोटो-कल्याण-स्नेहा भैसाणे

.........

Web Title: Woman's hand fractured due to water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.