महिलेची हत्या करून फेकले समुद्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:38 IST2021-05-17T04:38:24+5:302021-05-17T04:38:24+5:30

मीरा रोड : एका महिलेची हत्या करून फेकलेला तिचा मृतदेह हा भाईंदरच्या उत्तन येथील वेलंकनी तीर्थमंदिर जवळच्या समुद्र ...

The woman was killed and thrown into the sea | महिलेची हत्या करून फेकले समुद्रात

महिलेची हत्या करून फेकले समुद्रात

मीरा रोड : एका महिलेची हत्या करून फेकलेला तिचा मृतदेह हा भाईंदरच्या उत्तन येथील वेलंकनी तीर्थमंदिर जवळच्या समुद्र किनारी सापडला आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, मृत महिलेची ओळख मात्र पटलेली नाही.

नगरसेविका शर्मिला गंडोली यांचे पती अजित यांनी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात समुद्र किनारी एक मृतदेह असल्याची माहिती दिली. त्या अनुषंगाने पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला असता मृतदेह सापडण्याआधी सुमारे ४८ तास आधी तिचा गळा आवळून मृत्यू झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . तिच्या उजव्या हातावर इंग्रजीमध्ये पोर्णिमा ई बी यू असे गोंदलेले आहे. ५ फूट ४ इंच उंची आणि ३५ ते ४० वयोगटातील ही महिला असून, पोलिसांनी तिची ओळख पटावी म्हणून मुंबई - पालघर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांनाही माहिती पाठविली आहे.

Web Title: The woman was killed and thrown into the sea