डोंबिवलीत साडीने गळा आवळून महिलेची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:40 IST2021-03-21T04:40:03+5:302021-03-21T04:40:03+5:30
कल्याण : कोपर रोड परिसरात राहणाऱ्या आरती सकपाळ या महिलेची साडीने गळा आवळून अनोळखी इसमाने हत्या केली ...

डोंबिवलीत साडीने गळा आवळून महिलेची हत्या
कल्याण : कोपर रोड परिसरात राहणाऱ्या आरती सकपाळ या महिलेची साडीने गळा आवळून अनोळखी इसमाने हत्या केली आहे. विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरतीची शुक्रवारी रात्री तिच्या ओळखीच्या व्यक्तीने साडीने गळा आवळून हत्या केली. आरती ही पूर्वी कल्याणच्या एका बारमध्ये महिला वेटरचे काम करीत होती. लॉकडाऊनमध्ये तिचे काम गेले. त्यानंतर ती मासे विकत होती. शुक्रवारी रात्री आरतीच्या नातेवाईकाने तिच्या मोबाईलवर कॉल केला. अनेक वेळा कॉल करुनही ती फोन उचलत नसल्याने त्यांनी घरी जाऊन पाहिले असता ती मृतावस्थेत आढळली. या हत्येबाबत पोलिसांच्या हाती काहीच सुगावा लागला नसल्याने तिची हत्या कोणी व कशासाठी केली याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र तिच्या परिचित व्यक्तीकडूनही ही हत्या केली गेली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्या दिशेने पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
-------------------------------
वाचली