शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलीस अधिकाऱ्यास शिवीगाळ करून धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 05:55 IST

पोलीस अधिकारी शारदा देशमुख यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करणा-या बायजाबाई बागुल (३७) या रिक्षाचालक महिलेला पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.

ठाणे : कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या आवारात महिला पोलीस अधिकारी शारदा देशमुख यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करणा-या बायजाबाई बागुल (३७) या रिक्षाचालक महिलेला पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. तिच्या मुलीने परस्पर विवाह केल्याचे पोलिसांकडून समजल्यानंतर संतापाच्या भरात तिने देशमुख यांच्यासह इतरही महिला पोलिसांवर हल्ला केला. तसेच उपनिरीक्षक पवार यांनाही शिवीगाळ केली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बागुल यांची २२ वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी १० एप्रिल रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्या आधारे १२ एप्रिल रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या पथकाने तिला अहमदनगर (पारनेर) येथून आणले. चौकशीमध्ये आधी बायजाबाई यांच्या संमतीनेच या मुलीचा साखरपुडा झाला होता. मुलगा बागुल कुटुंबीयांच्या घराशेजारीच वास्तव्याला होता. पण, त्याला नोकरी नसल्याने मुलीच्या आईने या लग्नाला विरोध केला. मुलीला मुलगा पसंत असल्यामुळे तिने काही साक्षीदारांच्या मदतीने ९ एप्रिल रोजी ठाण्यातून पळून जाऊन आळंदीला त्या मुलासोबत १० एप्रिल रोजी लग्न केले. दरम्यान, मुलगी बेपत्ता असून तिचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा, असे सांगून कापूरबावडी पोलीस ठाण्यात १२ एप्रिल रोजी बायजाबाई यांनी चांगलाच गोंधळ घातला. कापूरबावडी पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुलीला तिच्या पतीसह १३ एप्रिल रोजी ठाण्यात आणले. मुलगी सज्ञान (१८ वर्षांवरील) असल्याने पोलिसांनी तिच्या लग्नाबद्दल विचारपूस केली. तेव्हा तिने रीतसर लग्न केल्यानंतर पारनेर पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिल्याचेही सांगितले. हीच बाब पोलिसांनी तिची आई बायजाबाई यांना सांगितले. मुलीने लग्न केल्याचे न रुचल्याने बायजाबाई यांनी आक्रमक पवित्रा घेऊन पोलीस ठाण्याच्या आवारातच दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गोंधळ घातला.>धमकीही दिली!महिला पोलीस उपनिरीक्षक शारदा देशमुख यांना धक्काबुक्की करून अश्लील शिवीगाळही केली. तसेच उपनिरीक्षक पवार यांच्यासह अन्यही दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी धक्काबुक्की केली. एवढ्यावरच न थांबता जावई आणि मुलीचे तुकडेतुकडे करून टाकीन आणि स्वत:ही आत्महत्या करून सर्वांना अडकवेन, अशी धमकी दिली. मुलीचा पती आणि त्याची बहीण यांनीही मारहाण करून शिवीगाळ केली. प्रकरण चिघळल्यानंतर पोलिसांनी अखेर याप्रकरणी बायजाबाई बागुल यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, महिला पोलीस अधिकाºयावर धावून जाणे, मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिल्याची तक्रार कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल झाली.

टॅग्स :Policeपोलिस