शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

नाशिकची विवाहिता मिळाली ठाण्यात, नौपाडा पोलिसांची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 22:59 IST

नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या परिसरातून अचानक बेपत्ता झालेली महिला ठाण्यात मिळाली. तिला नौपाडा पोलिसांनी शनिवारी पालकांच्या स्वाधीन केले.

ठळक मुद्दे पालकांच्या केले स्वाधीनस्मृतीभ्रंश झाल्याने तिच्यापुढे संभ्रमगंगापूर पोलिसांची घेतली मदत

ठाणे : नाशिक येथून ठाण्यात आलेली एक मानसिक विकलांग असलेली उषा रवी कांबळे (१९) ही विवाहिता ठाण्यात पोलिसांना संशयास्पदरीत्या मिळाली. नौपाडा पोलिसांनी विश्वासात घेऊन तिची माहिती काढून गंगापूर (नाशिक) पोलीस आणि तिच्या आईच्या ताब्यात शनिवारी तिला दिले. आपल्या आईची भेट घडवून आणल्याबद्दल तिने पोलिसांप्रति समाधान व्यक्त केले.आपले नाव उषा रमेश कांबळे असे सांगणारी ही विवाहिता ठाण्याच्या नौपाडा परिसरात फिरताना पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले यांना शुक्रवारी सायंकाळी मिळाली होती. अवघे २० रुपये जवळ असलेल्या या महिलेला सुरुवातीला स्वत:चे नावही आधी सांगता येत नव्हते. नंतर, तिने स्वत:चे माहेरचे वरील संपूर्ण नाव आणि पतीचे नाव रमेश असल्याचे सांगितले. बरीच चौकशी केल्यानंतर तिने साठेनगर येथे चुलते वास्तव्याला असल्याचे सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कपिले यांनी शनिवारी पहाटेपर्यंत ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील साठेनगर भागात चौकशी केली. कुठेही तिचे नातेवाईक आढळले नाही. शनिवारी मात्र तिने आपण नाशिकहून भोसला मिलिटरी स्कूल, संत कबीरनगर परिसरातून आल्याचे सांगितले. हा परिसर गंगापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येत असल्याची माहिती असल्यामुळे कपिले यांनी या पोलीस ठाण्यात संपर्क साधला. तिथे गेल्या दोन दिवसांपासून ही महिला बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, गंगापूर पोलीस ठाण्याचे जमादार देशमुख यांच्या मदतीने तिची आई कांताबाई आठवणी यांना पाचारण करून नौपाडा पोलिसांनी तिला त्यांच्या ताब्यात दिल्याचे धुमाळ यांनी सांगितले.............................

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणे