...अन् चिमुकल्यांनी पहिल्यांदा ऐकली आईची हाक!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 06:07 AM2018-08-05T06:07:36+5:302018-08-05T06:07:48+5:30

त्यांनी कोणताच आवाज ऐकला नव्हता. मेयो रुग्णालयाच्या ‘एडीआयपी’ योजनेंतर्गत चिमुकल्यांवर ‘कॉक्लीअर इम्प्लान्ट’ करण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच आईची हाक ऐकली.

... and for the first time, my mom's voice was heard! | ...अन् चिमुकल्यांनी पहिल्यांदा ऐकली आईची हाक!

...अन् चिमुकल्यांनी पहिल्यांदा ऐकली आईची हाक!

 - सुमेध वाघमारे 
नागपूर : त्यांनी कोणताच आवाज ऐकला नव्हता. मेयो रुग्णालयाच्या ‘एडीआयपी’ योजनेंतर्गत चिमुकल्यांवर ‘कॉक्लीअर इम्प्लान्ट’ करण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच आईची हाक ऐकली. श्रवणदोष दूर करण्यासाठी ‘कॉक्लीअर इम्प्लान्ट’ केली जाते. त्यासाठी सुमारे १० लाख खर्च येतो. ऐपत नसल्यास केंद्र मदत करते. शनिवारी १० शस्त्रक्रिया पार पडल्या. रविवारी सहा शस्त्रक्रिया होणार आहेत. प्रसिद्ध ईएनटी सर्जन पद्मश्री डॉ. मिलिंद कीर्तने यांनी त्या केल्या.
>असे केले इम्प्लान्ट’
कॉक्लीअर इम्प्लान्टमध्ये कानाच्या मागून मध्यकर्णामध्ये छिद्र केले जाते. अंतर्कर्णातील ‘कॉक्लीआ’मध्ये हे यंत्र बसविले जाते. त्यात कानाच्या वरील भागात एक छोटे उपकरण बसविले जाते. एका वायरद्वारे वाचाकेंद्रापर्यंत ध्वनी पोहोचविला जातो. ‘इम्प्लान्ट’मुळे शब्द आणि त्याची संरचना त्या मुलाच्या मेंदूपर्यंत थेट जाते. शब्द समजण्यास व बोलण्यास मदत होते. इम्प्लान्टसाठी बाळाचा एक ते पाच वर्षांपर्यंतचा काळ सर्वोत्तम असतो. ‘इम्प्लान्ट’नंतर तीन वर्षे ‘स्पीच थेरपी’ आवश्यक असते.
>पाच वर्षांचा शाहीद व चार वर्षांचा फिजा यांची आई म्हणाली, हे दोघेही जन्मापासून आवाजाच्या दिशेने पाहात नव्हते. डॉक्टरांकडे नेल्यानंतर कर्णबधिरपणा असल्याचे नक्की झाले. शस्त्रक्रियेसाठीचा खर्च आमच्या आवाक्याबाहेर होता. आता दोघेही माझा आवाज ऐकून प्रतिसाद देताना पाहून आई म्हणून होणारा आनंद सांगता येणार नाही.

Web Title: ... and for the first time, my mom's voice was heard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.