शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

एक्स्प्रेस गाडीच्या शौचालयात महिलेने दिला बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 02:01 IST

express train : उत्तर प्रदेश राज्यातील मारियाहू गावातील राजेश विश्वकर्मा (३३) हा आपल्या पत्नीसह नालासोपारा येथे मागील काही वर्षांपासून राहत होता. त्याची पत्नी गर्भवती असल्याने तिची प्रसुती डिसेंबर महिन्यात होईल, असे त्याच्या खासगी डॉक्टरांनी सांगितले होते.

पालघर : मुंबईमधून उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या वांद्रे-गाझीपूर कोविड स्पेशल एक्स्प्रेस गाडीच्या शौचालयात गुडिया विश्वकर्मा (२७) या महिलेने रविवारी रात्री १२ वाजता बाळाला जन्म दिल्याची घटना घडली. दोघेही बाळ-बाळंतीण सुखरूप असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.उत्तर प्रदेश राज्यातील मारियाहू गावातील राजेश विश्वकर्मा (३३) हा आपल्या पत्नीसह नालासोपारा येथे मागील काही वर्षांपासून राहत होता. त्याची पत्नी गर्भवती असल्याने तिची प्रसुती डिसेंबर महिन्यात होईल, असे त्याच्या खासगी डॉक्टरांनी सांगितले होते. तिची काळजी घेण्यासाठी बाळंतपणासाठी तिला आपल्या गावी आई-वडिलांकडे सोडायला दोघांनीही रविवारी मुंबईहून वांद्रे-गाझीपूर एक्स्प्रेस पकडली. या एक्स्प्रेसने विरार स्थानक सोडल्यानंतर गुडियाला प्रसुती वेदना होऊ लागल्या. वेदना वाढू लागल्याने तिने शौचालय गाठले आणि मोठा धीर एकवटून स्वतःच्या प्रयत्नाने बाळाला सुखरूप जन्म दिला. या घटनेची माहिती तिकीट तपासनीसाला देण्यात आल्यानंतर त्यांनी पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठांशी संपर्क साधून ट्रेन पालघर येथे थांबविण्याची परवानगी मिळविली. पालघर रेल्वे स्थानकात रात्री १२ वाजता ट्रेन थांबविण्यात आल्यानंतर त्या महिलेला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी त्या महिला आणि बाळाची तपासणी करून त्यांना घरी सोडले. या महिलेच्या प्रसुतीनंतर झालेला खर्च पश्चिम रेल्वे प्रशासनाने डॉ. चव्हाण यांना देण्याचे कबूल केले, मात्र डॉक्टरांनी ते बिल नाकारले.

टॅग्स :railwayरेल्वेthaneठाणे