पत्रा पयावर पडून मुंब्र्यात महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:25 IST2021-07-19T04:25:16+5:302021-07-19T04:25:16+5:30

मुंब्रा : संततधार पावसामुळे कमकुवत झालेली झाडाची फांदी मुंब्र्यातील कैलासनगर परिसरातील रिना वाघरी या महिलेच्या घरावर शनिवारी रात्री पडली. ...

The woman fell in Mumbra and was injured | पत्रा पयावर पडून मुंब्र्यात महिला जखमी

पत्रा पयावर पडून मुंब्र्यात महिला जखमी

मुंब्रा : संततधार पावसामुळे कमकुवत झालेली झाडाची फांदी मुंब्र्यातील कैलासनगर परिसरातील रिना वाघरी या महिलेच्या घरावर शनिवारी रात्री पडली. यामुळे पत्रा फुटून तिच्या पायावर पडल्यामुळे ती किरकोळ जखमी झाली आहे. तिच्या बाजूला झोपलेला चिमुरडा थाेडक्यात बचावला.

शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील अमृतनगर, एमके, पाइप कपाऊंड तसेच कादर पॅलेस, चांद नगर आदी भागातील तळमजल्यावरील अनेक घरे तसेच दुकानांमध्ये पाणी शिरले होते. अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली होती. येथील नागरी वसाहतीमधून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरून वाहणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यामध्ये काही दुचाकी वाहत असल्याचे बघून प्रसंगावधान राखून स्थानिक नागरिकांनी त्या सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवल्या. तसेच बकरा मंडईतील बकऱ्यांना पाण्याची झळ बसू नये, यासाठी त्यांनाही सुरक्षित स्थळी हलवले.

Web Title: The woman fell in Mumbra and was injured