विटा डोक्यात पडून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:29 IST2021-05-28T04:29:23+5:302021-05-28T04:29:23+5:30

मुंब्रा : निर्माणाधिन बांधकामाच्या ठिकाणी ठेवलेल्या विटा डोक्यावर पडल्यामुळे वनिता चौगुले या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ...

Woman dies after falling head over heels | विटा डोक्यात पडून महिलेचा मृत्यू

विटा डोक्यात पडून महिलेचा मृत्यू

मुंब्रा : निर्माणाधिन बांधकामाच्या ठिकाणी ठेवलेल्या विटा डोक्यावर पडल्यामुळे वनिता चौगुले या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. त्या खर्डीगावात राहत होत्या. नुकत्याच येऊन गेलेल्या तौउते वादळाच्या दिवशी मृत वनिता आणि त्यांचा मुलगा संदेश खर्डी गावातील रस्त्यावरून घरी चालले होते. त्यावेळी परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सातव्या मजल्यावर ठेवण्यात आलेल्या विटा हवेमुळे खाली पडल्या. यातील काही विटा डोक्यावर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या वनिता यांचा मृत्यू झाला. याबाबत त्यांच्या मुलाने बुधवारी रात्री दाखल केलेल्या तक्रारीवरून कनक रिअल इस्टेटच्या व्यवस्थापकाविरोधात शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गोविंद आरळेकर यांनी लोकमतला दिली.

Web Title: Woman dies after falling head over heels