ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू; नागरिकांमध्ये संताप, ट्रकचालकावर गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: August 30, 2023 18:52 IST2023-08-30T18:52:40+5:302023-08-30T18:52:44+5:30
याप्रकरणी ट्रक चालकावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू; नागरिकांमध्ये संताप, ट्रकचालकावर गुन्हा दाखल
उल्हासनगर: कॅम्प नं-३, १७ सेक्शन चौकात मंगळवारी रात्री ८ वाजता भरधाव ट्रक खाली सापडून रीना बीजलानी या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर १७ सेक्शन चौकातून मंगळवारी रात्री ८ वाजता रीना बीजलानी ह्या पती मनोहर बीजलानी यांच्या सोबत जात होत्या. त्यावेळी एमएच-०५, डि,के-८५६२ क्रमांकाच्या भरधाव ट्रक रीना यांच्या अंगावरून गेल्याने, त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी घाव घेऊन रीना यांचा मृतदेह उत्तर तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविला आहे.
याप्रकरणी ट्रक चालकावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस अधिक तपास करीत आहेत. १७ सेक्शन चौकात वाहतूक कोंडीची समस्या कायम असून यावर ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे.