शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत महिलेची तिन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या 

By नितीन पंडित | Updated: May 3, 2025 20:14 IST

महिलेचा पती रात्रपाळी वरून कामावरून सकाळी नऊ वाजता घरी परतल्या नंतर सदरची घटना समोर आली आहे.

भिवंडी: शहरातील फेणे गाव येथे महिलेने आपल्या तीन मुलींसह स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेचा पती रात्रपाळी वरून कामावरून सकाळी नऊ वाजता घरी परतल्या नंतर सदरची घटना समोर आली आहे.        फेणे गाव येथील एका चाळीत लालजी बनवारीलाला भारती हा यंत्रमाग कामगार पत्नी पुनिता वय ३२ व मुली नंदिनी वय १२,नेहा वय ७ व अनु वय ४ वर्ष यांसोबत राहत होता.लालजी रात्रपाळीसाठी कामावर गेला होता सकाळी नऊ वाजताच्या सुमारास तो घरी परतला असता घरचा दरवाजा आतून बंद होता.अनेक वेळा दरवाजा वाजवून ही पत्नीने दरवाजा न उघडल्याने पती लालजी याने छोट्या खिडकी तून आत डोकावून पाहिले असता त्याच्या पायाखालची जमीन सरकली.हतबल झालेल्या लालजीने टाहो फोडत दरवाजा उघडला असता आत मध्ये छताच्या लोखंडी अँगल वर गळफास घेऊन आत्महत्या केलेले मृतदेह आढळून आले.       या घटनेची माहिती मिळताच भिवंडी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्व.इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले.घटनास्थळी आत्महत्या मी स्वतःच्या मर्जीने करीत असून आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे लिहिलेली चिट्ठी मिळाली असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. महिलेने मुलींसह आत्महत्या का व कोणत्या कारणांमुळे केली हे अजून स्पष्ट नसले तरी पोलिस अनेक बाजूने या आत्महत्येचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेbhiwandiभिवंडीPoliceपोलिस