जागेसाठी महिलेला महिला चावली! , ‘अंबरनाथ फास्ट’मधील गोष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:42 IST2018-02-19T00:42:16+5:302018-02-19T00:42:19+5:30
जीवघेण्या गर्दीत जागा मिळवण्यासाठी अडथळा करत असलेल्या महिलेच्या हाताला चावणारीला अन्य महिलांनी ठाणे स्टेशनवर धारेवर धरले.

जागेसाठी महिलेला महिला चावली! , ‘अंबरनाथ फास्ट’मधील गोष्ट
ठाणे : जीवघेण्या गर्दीत जागा मिळवण्यासाठी अडथळा करत असलेल्या महिलेच्या हाताला चावणारीला अन्य महिलांनी ठाणे स्टेशनवर धारेवर धरले. मारहाण होण्याच्या भीतीने स्टेशनवर न उतरता संबंधित महिलेला पुढच्या स्टेशनवर जावे लागले.
ही घटना येथील प्लॅटफॉर्म क्र. ५ वर शनिवारी रात्री ८.३९ ला घडली. अंबरनाथला जाणारी फास्ट लोकल प्लॅटफॉर्मवर येताच महिलांच्या शेवटच्या डब्यात एकच आरडाओरड ऐकायला मिळाला. मुंबईहून येणाºया काही महिला ठाणे स्टेशनवर उतरणार होत्या. त्यांनी आधीच दरवाजाजवळ गर्दी केली होती. मात्र, सर्वांच्या मागे असलेल्या महिलेलादेखील दरवाजाजवळ येऊन गाडी थांबताच उतरायचे होते. यासाठी तिने धडपड सुरू केली. दरम्यान, शाब्दिक चकमक होऊन बाचाबाची झाली.
एवढ्यावरच हा विषय न थांबता दरवाजात येण्यासाठी प्रयत्न करणाºया महिलेने दुसºया महिलेस कडकडून चावा घेतल्याने डब्यात चांगलाच गोंधळ सुरू झाला. ज्या महिलेचा चावा घेतला, तिची बाजू घेत अन्य महिलांच्या घोळक्याने चावणाºया महिलेला ठाणे स्टेशनवर खाली खेचण्याचा प्रयत्न केला; पण मारहाणीच्या भीतीने आरडाओरड करणारी महिला प्लॅटफॉर्मवर न उतरता डब्यातच राहिली. दरवाजात
सुरू असलेल्या महिलांच्या या भांडणामुळे नाइलाजास्तव
मोटारमनला काही काळ गाडी थांबवणे भाग पडले.