उल्हासनगरात महिलेची २३ लाख ५३ हजाराने फसवणूक
By सदानंद नाईक | Updated: February 5, 2024 17:11 IST2024-02-05T17:10:49+5:302024-02-05T17:11:31+5:30
या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

उल्हासनगरात महिलेची २३ लाख ५३ हजाराने फसवणूक
सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-३ परिसरात राहणाऱ्या पूनम तलरेजा यांना १ कोटी पेक्षा जास्त लोण मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या प्रकाश झा याने २३ लाख ५३ हजार ८३७ रुपयाने फसवणूक केली. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात राहणाऱ्या पूनम तलरेजा यांचा टेक्स्टाईल ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. पूनम यांना मोठे लोण मंजूर करून देण्याचे आमिष ओळखीच्या प्रकाश झा या इसमाने दाखविले. १७ ऑक्टोबर २०२३ ते ३० जानेवारी २०२४ दरम्यान प्रकाश झा याने पूनम यांना २५ लाखाचे कर्ज मंजूर करून दिले. तसेच लोण क्लोज करून देण्याच्या बहाण्याने, प्रकाश झा याने पूनम तालरेजा यांच्या बँकेतून त्याच्या बँक खात्यात २३ लाख ५३ हजार ८३७ वळवून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तलरेजा यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन, झालेला प्रकार पोलिसांना कथन केला. पोलिसांनी प्रकाश झा याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून मध्यवर्ती पोलीस अधिक तपास करीत आहे.