वेश्यागमनासाठी मुली पुरवणाऱ्या महिला दलालास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:41 IST2021-04-01T04:41:36+5:302021-04-01T04:41:36+5:30
मीरारोड : काशीमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्गावर असलेल्या दाराज ढाबा हॉटेल भागात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने धाड टाकून ...

वेश्यागमनासाठी मुली पुरवणाऱ्या महिला दलालास अटक
मीरारोड : काशीमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्गावर असलेल्या दाराज ढाबा हॉटेल भागात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने धाड टाकून महिला दलालास अटक केली. वेश्यागमनासाठी आणलेल्या एका अल्पवयीन मुलीसह एकूण तीन पीडित मुलींची पोलिसांनी सुटका केली. नीशा ऊर्फ अमरजित जसवंत सिंग कौर (वय ३०, रा. स्वागत हाईट्स, जीसीसी क्लबजवळ, मीरारोड) असे अटक केलेल्या दलाल महिलेचे नाव आहे. ती पैसे घेऊन वेश्यागमनासाठी मुली पुरवत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील यांना मिळाली होती. ढेमरे, पाटील, निलंगे, यंबर, चव्हाण यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, श्रद्धा नावाच्या आणखी एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
...........
वाचली