शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीची धमकी देत खंडणीची मागणी करणाऱ्या महिलेस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 20:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : आपल्याच एकेकाळच्या वकील मित्राविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडून ५० हजारांची ...

ठळक मुद्दे न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन ठाणेनगर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: आपल्याच एकेकाळच्या वकील मित्राविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडून ५० हजारांची खंडणी उकळणाºया महिलेला ठाणेनगर पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने या महिलेचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.ठाण्यातील एका वकीलाबरोबर सिंधुदुर्ग येथील एका महिलेची मैत्री झाली होती. याच मैत्रितून तिने चार लाखांच्या खर्चातून त्याला ठाण्यात पार्लर टाकून देण्यास सांगितले. हे पार्लर टाकल्यानंतर कालांतराने तिने या पार्लरच्या सामानाची विल्हेवाट लावून मुंब्रा येथील जेन्टस पार्लरमध्ये कामाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्यात भांडणे झाल्यानंतर तिने या वकिलाकडे दोन लाखांच्या खंडणीची मागणी करीत लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. नंतर तिने त्याच्याकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली. या त्रासाला कंटाळून त्याने तिला ५० हजार रुपये दिले. तरीही हा त्रास देणे तिने सुरुच ठेवले. हा प्रकार २७ जून २०१५ ते २१ मार्च २०१६ या काळात घडला. या प्रकरणी या वकीलाने या महिलेसह तिघांविरुद्ध १८ फेब्रुवारी २०२० रोजी फसवणूक, खंडणी मागणे आदी कलमांखाली तक्रार दाखल केली. याप्रकरणात ठाणे न्यायालयाने या महिलेचा ५ जानेवारी २०२० रोजी अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला. त्यानंतर ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांच्या पथकाने या महिलेला ९ जानेवारी २०२१ रोजी अटक केली.* दरम्यान, यातील तक्रारदार असलेल्या वकीलाविरुद्ध या महिलेने जून २०१५ मध्ये लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. यात त्याला अटकही झाली होती. तेंव्हाही तक्रार दाखल करण्यापूर्वी आणि आरोपपत्र दाखल करण्यापूर्वीही तिने आपल्याकडे पैशांची मागणी केली होती, असेही या वकीलाने पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक