विजेचा धक्का बसून वायरमनचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:40 AM2021-07-31T04:40:32+5:302021-07-31T04:40:32+5:30

उल्हासनगर : कॅम्प नं.- ३ फॉरवर्ड लाइन चौक परिसरातील पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम करीत असताना, विजेचा जोरदार धक्का बसून वायरमन ...

Wireman dies of electric shock | विजेचा धक्का बसून वायरमनचा मृत्यू

विजेचा धक्का बसून वायरमनचा मृत्यू

Next

उल्हासनगर : कॅम्प नं.- ३ फॉरवर्ड लाइन चौक परिसरातील पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम करीत असताना, विजेचा जोरदार धक्का बसून वायरमन दिलीप मोहिले (५४) यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी व उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी मृत वायरमनच्या कुटुंबाला मदतीचे आश्वासन दिले.

उल्हासनगर महापालिकेचा विद्युत विभाग कर्तव्यदक्ष कारभारासाठी ओळखला जातो. शुक्रवारी विभागाचे काही वायरमन कॅम्प नं.-३ फॉरवर्ड लाइन रस्त्यावरील पथदिव्याची दुरुस्ती करीत होते. दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान मोहिले यांना विजेचा जोरदार धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मध्यवर्ती रुग्णालयात मोहिले यांना नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता हनुमंत खरात यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. मृत दिलीप मोहिले यांना दोन मुले असून, त्यांच्या पत्नीचे गेल्याच वर्षी निधन झाले.

..........

Web Title: Wireman dies of electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.