विजयी विश्व तिरंगा प्यारा...
By Admin | Updated: August 18, 2015 00:12 IST2015-08-18T00:01:13+5:302015-08-18T00:12:27+5:30
स्वातंत्र्यदिन : शाळा, कार्यालयांमध्ये ध्वजवंदन

विजयी विश्व तिरंगा प्यारा...
विजयी विश्व तिरंगा प्यारा...स्वातंत्र्यदिन : शाळा, कार्यालयांमध्ये ध्वजवंदननाशिक : स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरातील विविध शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय कार्यालये, सामाजिक संघटनांच्या वतीने ध्वजवंदन करण्यात आले. त्याचप्रमाणे विविध उपक्रमही घेण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक मंडळ संचलित अभ्यासिका आणि श्रीराम सार्वजनिक वाचनालय, पंचवटी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्याभवन इमारत, गणेशवाडीरोड, पंचवटी येथे रमेश गायधनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्राचार्य डी. के. गोसावी यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेचे सरचिटणीस भास्करराव तानपाठक यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, खजिनदार सुभाषचंद्र अग्रवाल, राजेश शेळके, विलास आव्हाड, विजय फड, महेश अग्रवाल, डॉ. पारस सुराणा, सुरेंद्र टाटिया, जगदीश पाटील, दीपक सानप, कैलास आंबेकर, भुपेन जोशी, विजय खाचणे, देवीदास सावळे, श्रीधर महाशब्दे कर्मचारी व नागरिक सदर कार्यक्रमास उपस्थित होते.
छत्रपती फ्रेंड सर्कल
छत्रपती फ्रेंड सर्कलच्या वतीने पेठ फाटा, पंचवटी येथे तरुणांच्या व नागरिकांच्या सहकार्याने ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील सुनील दिवे, संजय पगारे, आशा जाधव, कमल वाघ, पंढरीनाथ गवळी व सागर निकम व नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते मनोज धुमाळ, ज्योती संचेती आणि छत्रपती फ्रेंड सर्कलचे कार्यकर्ते उपस्थित होते.
किड्स झी शाळा
अश्विननगर येथील किड्स झी स्कूलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुलांनी कोलाज काम करून तिरंगा तयार केला. तसेच विविध क्रांतिकारकांच्या वेशभूषा केल्या. प्रास्ताविक नंदा अहिरे यांनी केले. पूर्वा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
त्रिशरण संस्था
त्रिशरण यंग फ्रेंड संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त झेंडावंदन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष विनोद भडांगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्रमास दीपक पवार, श्रीकृष्ण मोहोड, संभाजी सावळे, बागुल, एच. बी. साळवे, विजय जमदाडे, पवन गेडाम, बी. वाय. खरे, संघर्ष बागुल, एम. डी. प्रताप, वामन गांगुर्डे, रंगारी, लक्ष्मीबाई वानखेडे, केदा बच्छाव, गनी शेख, वसंत भालेराव, प्रमोद पराडो, वासुदेव लोणारे, रोहिदास ढाले उपस्थित होते.