शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदर शहरातील भाजपमध्ये असंतोषाचे वारे; भ्रष्ट प्रवृत्तींना पक्षातून काढण्याची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 23:39 IST

सहप्रवक्ते संजय तिवारी यांनी दिला राजीनामा

मीरा रोड : मीरा- भाईंदर भाजपमध्ये निष्ठावंतांना स्थान नाही. जे पैसे आणि टेंडरसाठी काम करतात अशांचा हा पक्ष झाल्याची टीका करत भाजपचे जिल्हा सहप्रवक्ते संजय तिवारी यांनी आपले पद व पक्षाचा राजीनामा दिला. तर, भाजपला व्यक्ती व कंपनीच्या हितासाठी राबवले जात आहे. अशा व्यक्तींची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. सुरेश येवले यांनी केली आहे.

मीरा-भाईंदरमधील भाजपची सूत्रे नरेंद्र मेहतांच्या हाती सोपवल्या पासून अनेक ज्येष्ठ व निष्ठावंतांनी विरोध चालवला होता. पण नंतर काहींनी जुळवून घेतले तर काहींनी आपली भूमिका कायम ठेवली. मोदी लाटेत येथील राजकीय समीकरणे बदलल्याने २०१४ मध्ये मेहता आमदार झाले. त्यानंतर अन्य पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी भाजपमध्ये आल्याने २०१७ मध्ये महापालिकेत भाजपचे ६१ नगरसेवक निवडून आले. परंतु पालिकेतील सत्ता ही मेहता व त्यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीच्या फायद्यासाठी राबवली जात असल्याची टीका, भ्रष्टाचार-गुंडगिरी, तसेच मनमानी कारभाराविरोधातील संताप, पक्षाची वाढती बदनामी आदी कारणांनी पक्ष व मेहता नेहमीच वादग्रस्त राहिले. विधानसभा निवडणुकीतही मेहतांचा दारूण पराभव भाजपाच्याच बंडखोर गीता जैन यांनी केला.

या पराभवानंतर तिवारी यांनी पद आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षात १९ वर्षे प्रामाणिकपणे मेहनत केली त्याचा पश्चाताप होत आहे. भाजपत चमचे खूप झाले आहेत. त्यामुळे निष्ठावंतांची कदर नाही. जे पैसे आणि टेंडरसाठी काम करतात अशा लोकांचा भाजप पक्ष झाला आहे. भाजप पहिल्या सारखा पक्ष राहिलेला नाही. जुन्या लोकांना मान नाही आणि नवीन लोकांना जबाबदारी दिल्याने पराभव झाला, अशी टीका तिवारी यांनी केली आहे.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेश मागासवर्गीय मोर्चाचे विषेश निमंत्रित सदस्य तथा ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले डॉ. सुरेश येवले यांनीही मीरा- भार्इंदर भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रेंसह पराभूत आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता आदींना जबाबदार धरले आहे. शहरात भाजपला मेहता व त्यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीसाठी राबवले गेले. त्यांच्या हिताचे निर्णय महापालिकेत घेतले गेले. चुकीच्या लोकांच्या हाती पक्ष दिल्याने शहरात भ्रष्टाचार, गुंडगिरी, दडपशाही वाढून पक्षाची आणि पक्ष नेतृत्वाची प्रतिमा मलीन झाली. यातूनच लोकांमध्ये असंतोष खदखदत होता. त्यामुळे आमदार व महापौरांसह ६१ नगरसेवक, संघटना, पैसा असूनही नागरिकांनी भाजप उमेदवाराला पराभवाची धूळ चारली, असे डॉ. येवले म्हणाले.डॉ. येवले भाजपमध्ये आहेत? : डॉ. येवले भाजपमध्ये आहेत? असा सवाल भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी केला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकी वेळी येवले, अच्छे दिन कुठे आले विचारत मोदींच्या विरोधात बोलत होते. त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. तेच स्वत:ला भाजपचे जुने कार्यकर्ते समजतात.तिवारी यांचा राजीनामा अजून माझ्याकडे आलेला नाही. मी स्वत: तिवारींशी बोलणार आहे, असे म्हात्रे म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाMira Bhayanderमीरा-भाईंदर