शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

१५०० रुपयांची लाच घेऊन महाराष्ट्र विकायला देणार का? उद्धव ठाकरे यांचा जनतेला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 06:17 IST

एकनाथ शिंदे मोदींसमोर सरपटणारे मांडूळ, अशीही केली टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून १५०० रुपयांची लाच देऊन तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न मिंधे सरकारकडून केला जात आहे. केवळ १५०० रुपयांसाठी तुम्ही महाराष्ट्र विकायला देणार आहात का, असा सवाल उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला. महिलांनी आता ‘आम्हाला लाच नको तर रोजगार द्या’, अशी मागणी केली पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे उद्धवसेनेच्या वतीने ‘भगवा सप्ताहा’च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. ठाकरे म्हणाले की, आता शिक्षण, पुस्तके यांच्यासह आरोग्य विम्यावर जीएसटी लावला आहे. म्हणजेच ‘जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी जीएसटी भरा’. राज्य सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. तीन महिने थांबा मग तुमचे सरकारी मिंधे यांच्या कलेक्टरांना कुठे पाठवतो ते बघाच, असा इशाराही त्यांनी दिला.

ठाण्याने आजवर शिवसेनेवर प्रेम केले, याच प्रेमापोटी शिवसेना ठाण्यात टिकून आहे. ठाणेकरांनी मेहनत घेतली नसती तर मिंधेची दाढी सुद्धा उगवली नसती, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. आधी १५ लाख देणार होते, आता मात्र १५०० वर बोळवण करण्याचे काम झाले असून वरचे शून्य कोणाच्या खिशात गेले, असा सवाल ठाकरे यांनी केला. ठाण्यात क्लस्टर योजनेची कामे आपल्या मर्जीतील ठेकेदारांनाच दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी शिंदे सरकारवर केला. त्यांच्या या कृत्यामुळेच ठाणे महापालिकेला कर्जाचे डोहाळे लागले, अशी टीकाही त्यांनी केली.

महाराष्ट्राचे मंत्रालय मुंबई की अहमदाबादला हवे, असा सवाल उपस्थित करीत आताची लढाई ही शिवसेना विरुद्ध मिंधे नसून महाराष्ट्र द्वेष्ट्यांविरुद्ध असल्याचेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत मशाल पेटवायची आहे, लोकशाहीची हत्या करणाऱ्यांचे बूड जाळायचे आहे, असे ठाकरे म्हणाले. काल नागपंचमी झाली, यादिवशी नागाला दूध पाजतात. उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील सापाला दूध पाजले. लोकसभेत शेपट्या वळवळल्या. पण, विधानसभेत आम्ही त्यांचे फणे ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.

‘आणि म्हणून...’ची उडवली खिल्ली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाषण करताना ‘...आणि म्हणून’ या शब्दांचा वारंवार उल्लेख करतात असा उल्लेख करून उद्धव ठाकरे यांनी बोलायचे तर सरळ बोला, बोलताना यांना पोट साफ करायचे औषध देण्याची वेळ आल्याची टीका केली.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Rautसंजय राऊत