शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, ठाणे, पालघरच्या सर्व जागा जिंकणार; बोगस मतदानाची गरज नाही - मुख्यमंत्री शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 13:58 IST

उद्धव ठाकरे तोंडावर कधीच आपटलेत.  आता त्यांचे तोंड फुटेल,  अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानानंतर विरोधकांचा समाचार घेतला. मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व जागा महायुती जिंकणार, असा दावा शिंदे यांनी केला.

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकास करतोय. कोणत्याही  जाती - धर्मातील व्यक्तीला आम्ही विकासापासून लांब ठेवणार नाही. काँग्रेसला जे ६० वर्षांत करता आले नाही, ते नरेंद्र मोदींनी १० वर्षांत केले. त्यामुळे बोगस मतदानाची आम्हाला गरज नाही. उद्धव ठाकरे तोंडावर कधीच आपटलेत.  आता त्यांचे तोंड फुटेल,  अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानानंतर विरोधकांचा समाचार घेतला. मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व जागा महायुती जिंकणार, असा दावा शिंदे यांनी केला.

ठाण्यातील वागळे इस्टेट येथील नेपच्युन आयटी पार्कमधील मतदान   केंद्रामध्ये  मुख्यमंत्री शिंदे यांनी सहकुटुंब जाऊन मतदान केले. मतदानानंतर त्यांनी प्रसिद्धिमाध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी  लता शिंदे, मुलगा, कल्याणचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे आणि सून वृषाली  शिंदे यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

‘ते’ असे करतात आरोप शिंदे म्हणाले की, सकाळपासून मतदानासाठी मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून येत आहे.  सुदृढ लोकशाहीसाठी  तसेच देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी, महासत्ता बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यासाठी आवर्जून मतदान करावे. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्या दूर झाल्याचा दावा शिंदे यांनी केला. बोगस मतदानाच्या विरोधी उमेदवारांच्या आरोपांवर ते म्हणाले, बोगस मतदानाची आम्हाला गरज नाही, ज्यांना पराभव दिसतोय, ज्यांनी हत्यारे  टाकली त्यांना असे आरोप सुचतात. युवा पिढी देश घडवणारी आहे. त्यांच्यासाठीच आम्ही काम करतो.  युवकांनी बाहेर येऊन मतदान करावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. ठाणे, कल्याण, भिवंडी हे  युतीचे  बालेकिल्ले  आहेत. ठाणे, पालघर आणि मुंबई या जिल्ह्यातील सर्वच जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरे