शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

स्टेमकडून वाढीव १० एमएलडी पाणी ठाण्याला मिळणार का? स्टेमच्या कारभाराचा महापौरांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 21:59 IST

Thane : ठाणे महापालिकेला पाणी स्टेमकडून हक्काचे कमी पाणी मिळत नसताना बिल्डरांना मात्र स्टेमकडून बेकायदेशीर पाणीपुरवठा होत असल्याचेही बैठकीतून उघड झाले आहे.

ठाणे  : स्टेमकडे वाढीव १० एमएलडी पाणी पुरवठा मिळावा, यासाठी महापालिकेकडून वारंवार संबधींत यंत्रणोला पत्रव्यवहार करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही त्यांच्याकडून हा वाढीव पाणी पुरवठा करण्यात आलेला आहे. त्यातही स्टेम प्राधिकरणात सर्वात मोठा वाटा हा ठाणे महापालिकेचा आहे. स्टेम प्राधिकरणाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष स्वत: ठाण्याचे महापौर असताना ठाणे  महापालिकेला वगळून मीरा- भाईंदर आणि भिवंडी यासारख्या महापालिकांना मंजूर कोट्यापेक्षा अधिकचे पाणी दिले जात असल्याची धक्कादायक माहिती बुधवारी झालेल्या उघड झाली आहे. विशेष म्हणजे एकीकडे ठाणे महापालिकेला पाणी स्टेमकडून हक्काचे कमी पाणी मिळत नसताना बिल्डरांना मात्र स्टेम कडून बेकायदेशीर पाणीपुरवठा होत असल्याचेही या बैठकीतून उघड झाले आहे. तर स्टेम प्राधिकरणाच्या कारभाराबाबत ठाणो महापालिकेच्या अभियंत्यांनी देखील तक्रारीचा सूर लावल्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी याची गंभीर दाखल घेत स्टेमच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. दोन दिवसांत ठाण्याला १० एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. 

याशिवाय, यापुढे स्टेमचा अनियमित कारभार खपवून घेणार नसल्याचा सज्जड दमच महापौरांनी ठाणे महापालिकेत झालेल्या बैठकीत दिला आहे. स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे महापालिकेला होणार अनियमित तसेच वेळेवर न होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत महापौर नरेश म्हस्के यांनी बुधवारी ठाणे महापालिकेच्या बल्लाळ सभागृहात स्टेम प्राधिकरणाचे अभियंता, लोकप्रतिनिधी आणि ठाणो महापालिकेच्या अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक आयोजित केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी सुरु वातीलाच पालिका आयुक्तांनी स्वत: स्टेमकडे पत्रव्यवहार करून १० एमएलडी अतिरिक्त पाण्याची मागणी केली होती, त्याची अंमलबजावणी अद्याप स्टेम कडून झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. २० मे २०२० चा एक ठराव करण्यात आला असून यामध्ये खाजगी एजन्सीला पाणी वाटप करण्याचा अधिकार देण्यात आला असून ठाणो महापालिकेला विचारात न घेता स्टेम प्राधिकरणाने हा ठराव मंजूर कसा केला असा प्रश्न देखील मुल्ला यांनी या बैठकीत उपस्थित केला आहे.

स्टेम प्राधिकरणाच्या अभियंत्यांकडून मात्न ठाणे महापालिकेला दररोज ११३ एमएलडी पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा या बैठकीत करण्यात आला आहे. वाढीव पाणी देण्यासाठी काही तांत्रिक अडचणी असल्याचा खुलासा केल्यानंतर इतर महापालिकांना अतिरिक्त पाणी पुरवठा करताना या गोष्टी का आड येत नाही असा प्रश्न यावेळी लोकप्रतिनिधीनी उपस्थित केला. या सर्व ठाणो महापालिकेच्या अभियंत्यांनी देखील स्टेम प्राधिकरणाबाबत तक्रारीचा सूर लावल्यानंतर अखेर महापौर नरेश म्हस्के यांनी स्टेमच्या अभियंत्यांची चांगलीच कान उघाडणी करत दोन दिवसात ठाण्याला १० एमएलडी पाणीपुरवठा करण्याचे आदेश या बैठकीत दिले आहे. या बैठकीत स्थायी समिती सभापती संजय भोईर, उपमहापौर पल्लवी कदम, नगरसेवक हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, संजय वाघुले, उमेश पाटील, सुधीर कोकाटे तसेच अतिरिक्त आयुक्त गणोश देशमुख उपस्थित होते.

दरम्यान, या बैठकीत स्टेम प्राधिकरणावर जिल्हा परिषदेचे सीइओ हे एम डी म्हणून काम पाहत असले तरी कोणत्याच सीईओ कडून या प्राधिकरणाकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी या बैठकीत सांगितले. त्यामुळे ठाणे  महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तांची या ठिकाणी निवड करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. स्टेम प्राधिकरणाकडून महापालिकेला पाणी देणो गरजेचे असताना खाजगी गृहसंकुलांना परस्पर पाणी दिले जाते व ही मंडळी नियमित पैसे देखील देत नसल्याचे निदर्शनास येत असल्याचे सांगत खाजगी गृहसंकुलांना पाणी देण्याबाबतचे प्रस्ताव रद्द करावेत तसेच मागील काही महिन्यांमध्ये ३५ वेळा ब्रेकडाऊन केल्याने ठाण्यातील पाणी वितरण व्यवस्थेवर परिणाम होत असून शेवटच्या टोकापर्यत पाणी पोहचत नाही याबाबत सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता तातडीने करण्याचे निर्देश महापौर यांनी यावेळी दिले.  

स्टेम प्राधिकरणाच्या गव्हर्निंग कौन्सिलचा अध्यक्ष मी आहे. कोरोना काळात जे स्टेम प्राधिकरणाकडून काही चुकीचे निर्णय झाले असतील त्याला आम्ही मान्यता दिलेली नाही. ठाण्यातील आणि मिरा-भाईंदरच्या लोकांना पाणी न देता बिल्डरला गृहसंकुलाना पाणी देण्याचे प्रस्ताव मंजूर झाले असतील, काही नवीन प्रस्ताव मंजूर झाले असतील, काही लोक पाणी पुरवठा घेत आहेत पण बिल भरत नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. - नरेश म्हस्के - महापौर, ठामपा

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाWaterपाणी