शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
3
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
4
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
5
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
6
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
7
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
8
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
9
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
10
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
11
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
12
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
13
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
14
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
15
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
16
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
17
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
18
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
19
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
20
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
Daily Top 2Weekly Top 5

'नालेसफाई न करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:19 IST

नगराध्यक्ष प्रियेश जाधव यांचा इशारा; अधिकाऱ्यांसमवेत पाहणी

बदलापूर : बदलापूरमधील नाल्यांची सफाई करण्यात काम चुकारपणा करणारे, योग्य प्रकारे काम न करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याचा इशारा नगराध्यक्ष अ‍ॅड. प्रियेश जाधव यांनी सांगितले. त्या कंत्राटदाराला काळ््या यादीत टाकण्याचे निर्देश नगराध्यक्ष प्रियेश जाधव यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.नगराध्यक्ष जाधव यांनी शनिवारी पदाधिकारी व अधिकाºयांसमवेत नालेसफाईच्या कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. शिवसेना शहरप्रमुख व नियोजन समितीचे सभापती वामन म्हात्रे, महिला बालकल्याण सभापती शीतल राऊत, मुख्याधिकारी प्रकाश बोरसे, नगररचना अधिकारी विवेक गौतम, आरोग्य अधिकारी विजय कदम आदी दौºयात सहभागी झाले होते.शिरगाव, आपटेवाडी या भागातील नाल्याची सफाई योग्य पद्धतीने करण्यात आली नसल्याचे म्हात्रे यांनी मुख्याधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी पालिकेने रस्तारूंदीकरण करताना रस्त्याच्याकडेला बंदिस्त गटार केले होते. हे गटार बुजवून त्यावर बांधकाम झाल्याचेही म्हात्रे यांनी मुख्याधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिले.पावसाळ्यात कुठेही नाले वा गटारे तुंबून पाणी भरणार नाही याची दक्षता घ्यावी. या कामात जे कंत्राटदार कुचराई करतील अशांवर कारवाई करावी. कंत्राटदार जर ऐकत नसतील तर त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देशही नगराध्यक्ष जाधव यांनी मुख्याधिकारी बोरसे यांना दिले.सर्व बेकायदा बांधकामे हटवून गटार मोकळे करण्याचे आदेश बोरसे यांनी दिले. येत्या दोन दिवसात ही कारवाई पूर्ण करण्याचेही बोरसे यांनी यावेळी सांगितले. नाले सफाईचे काम व्यवस्थित सुरू आहे. काही ठिकाणी कचºयाचे प्रमाण वाढत आहे. तो कचरा काढून टाकण्यात येऊन नाले आणि गटारे मोकळी करण्यात येतील असे बोरसे यांनी यावेळी सांगितले. यामुळे यंदा पावसाळ्यात बदलापूरकरांना कमी त्रास सहन करावा लागेल, अशी आशा आहे.शहरातील खेमानीसह इतर नाले तुंबलेल्या अवस्थेत असल्याने, महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेला नालेसफाईचा दावा फोल ठरल्याची टीका होत आहे. जोरदार पाऊस आल्यास खेमानी नाल्यातील कचरा उल्हास नदीत वाहून जाण्याची भीती आहे. उल्हासनगरमध्ये मोठ्या नाल्यांसह लहान नाले सफाईचा ठेका खाजगी कंपनीला तब्बल ३ कोटींना देण्यात आला. नाले तुंबून वित्त तसेच जीवितहानी होऊ नये, यासाठी पावसाळ्यापूर्वी सफाई केली जाते, मात्र जून महिना अर्धा उलटल्यानंतरही मोठ्या नाल्यासह लहान नाले कचºयाने भरलेले आहेत. आरोग्य विभागाने ८० टक्क्यांपेक्षा जास्त नालेसफाईचा दावा केला होता. आयुक्त सुधाकर देशमुख ज्या सेंच्युरी गेस्ट हाऊसमध्ये राहतात, त्यांच्या समोरूनच खेमानी नाल्याचे सांडपाणी उल्हास नदीत जाते.खेमानी नाल्यासह मोठ्या नाल्यांच्या सफाईचा दावा पालिका आरोग्य विभागाने केला. मात्र, खेमानी नाल्यासह गुलशननगर नाला, रमाबाई आंबेडकर शाळेसमोरील नाला, समतानगर येथील नाला, कैलास कॉलनीतील नाला अजूनही तुंबलेलेच आहेत. असे असताना पालिका आरोग्य विभाग कोणत्या आधारे ८० टक्क्यांपेक्षा जास्त नालेसफाईचा दावा करते, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.मोठ्या नाल्यांप्रमाणे लहान नाल्यांची अवस्था आहे. नालेसफाईसाठी दररोज ३०० कंत्राटी कामगार काम करीत असल्याचे कागदावर सांगितले जाते. प्रत्यक्षात लहान नालेही तुंबलेल्या अवस्थेत आहेत. मग ठेकेदाराने नाल्याची सफाई केली का, असा प्रश्न विचारला जात आहे. तर नागरिकांनी नालेसफाईवर नाराजी व्यक्त करत नाले तुंबून वित्त आणि जीवितहानी झाल्यास पालिका प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे म्हटले आहे.