शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळाला 'दिबां'चे नाव देण्याकरिता संघर्ष करणार- कपिल पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 12:15 IST

बुधवारी कपिल पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, त्यांच्याकडे पंचायत राज विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली.

- नितीन पंडितभिवंडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या विश्वासाने केंद्रीय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी माझ्यावर सोपविली असून, मिळालेल्या संधीचा फायदा देश विकासासाठी जास्तीत-जास्त कसा होईल, त्याचबरोबर आपली जन्मभूमी असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघाबरोबरच ठाणे जिल्ह्याचा विकास कसा होईल, याकडे आपण विशेष लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी `लोकमत`कडे केले. ठाणे जिल्ह्यातील सर्व निवडणुकांत भाजपची पताका डौलाने फडकवत ठेवण्याकरिता पक्ष सोपवेल ती जबाबदारी पार पाडण्याची ग्वाही पाटील यांनी दिली.

बुधवारी कपिल पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, त्यांच्याकडे पंचायत राज विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. पदाची शपथ घेतल्यानंतर पाटील यांनी पहिल्यांदा `लोकमत`ला प्रतिक्रिया दिली. ठाणे जिल्ह्यातील आगामी महापालिका निवडणुकांमध्ये पाटील नेमकी काय भूमिका बजावणार, तुमचा सामना शिवसेनेसोबत होणार का, असे विचारले असता ते म्हणाले की, आता मी देशाचा राज्यमंत्री झालो आहे. त्यामुळे देशाचा विकास व देशाचे काम करण्याची संधी मला मिळाली असून, त्याकडेच सध्या माझे लक्ष आहे. 

नवी मुंबईत विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यावरून आंदोलन सुरू आहे. त्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले की, नवी मुंबई विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी माझ्यासह स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे. नवी मुंबई विमानतळाकरिता भूमिपुत्रांनी त्याग केला आहे. त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर केला गेलाच पाहिजे. त्याबाबत राज्य सरकार कोणती भूमिका घेते, याकडे आमचे लक्ष आहे.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलBJPभाजपाNavi Mumbaiनवी मुंबईMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार