शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा शिवसेना गड राखणार की, मनसेचे इंजीन धावणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 01:32 IST

२०१४ सालच्या निवडणुकीत शिवसेनेचे सुभाष भोईर हे निवडून आले होते. त्यामुळे मनसेला विजयाचे सातत्य राखता आले नाही.

मुरलीधर भवार।लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांचा सामना मनसेचे उमेदवार राजू पाटील यांच्यासोबत होणार आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांची उमेदवारी कापून त्यांच्या जागी म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. २००९ साली राजू पाटील यांचे मोठे भाऊ रमेश पाटील यांनी रमेश म्हात्रे यांचा पराभव केला होता. तेव्हाही म्हात्रे हे शिवसेनेचे उमेदवार होते. २००९ साली मनसेचे इंजीन कल्याण ग्रामीणमध्ये घुसले होते.

मात्र, २०१४ सालच्या निवडणुकीत शिवसेनेचे सुभाष भोईर हे निवडून आले होते. त्यामुळे मनसेला विजयाचे सातत्य राखता आले नाही. २०१५ सालापासून महापालिकेत समाविष्ट केलेल्या २७ गावांचा मुद्दा गाजतो. स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीसाठी सरकारकडून आश्वासन दिले जात आहे. तसेच २७ गावे व नवी मुंबईतून वगळलेली १४ गावे आणि दिव्याच्या विकासाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर या गावांना जोडणाऱ्या कल्याण-शीळ रोडवरील वाहतूककोंडीचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. या मुद्याभोवती या मतदारसंघात म्हात्रे विरुद्ध पाटील यांच्यात खरा सामना रंगला आहे. तो निश्चितच पाहण्यासारखा असेल.जमेच्या बाजूशिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. स्थायी समिती सभापतीचे पद चारवेळा भूषविले आहे. महापालिकेच्या महासभेत आरोग्य, बीएसयूपीची घरे, पाणीटंचाई या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले. नगरसेवकपदाचा दांडगा अनुभव. त्यांच्या पत्नीदेखील नगरसेविका आहेत. २७ गावांच्या विकासासाठी आग्रही आहेत. प्रदूषणाच्या मुद्यावर त्यांनी अधिकाºयाना घेरले होते. निवडणुकीचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.२००९ ते २०१४ या कालावधीत त्यांचे भाऊ रमेश पाटील हे या मतदारसंघाचे मनसेचे आमदार होते. २०१४ साली राजू पाटील यांनी मनसेच्या वतीने कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आहे. त्यामुळे त्यांच्या गाठीशी निवडणुकीचा अनुभव आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रिय आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे यशाचा दावा करीत आहेत.उणे बाजूस्पष्टवक्तेपणा हा गुण आहे. पण, राजकारणात काही वेळेस तो सगळ्यांनाच रूचत नाही. २७ गावे वेगळी करण्याच्या मुद्यावर सर्वपक्षीय संघर्ष समिती ठाम असताना शिवसेनेने ही गावे महापालिकेत समाविष्ट आहेत, त्यामुळे ती राहू द्यावीत. वेगळी करू नयेत, ही आग्रही भूमिका घेतली. पक्षाची ही भूमिका कदाचित त्रासदायक ठरू शकते. २७ गावांतील वेगळ्या नगरपालिकेचा मुद्दा हा शिवसेनेला मान्य नाही.पक्षाचे नेतेपद त्यांच्याकडे असूनदेखील पक्षाच्या अनेक स्थानिक कार्यक्रमांना ते उपस्थिती लावत नाहीत. पक्षाच्या कार्यक्रमातील प्रसिद्धीपासून ते दूर राहणे पसंत करतात. त्यांच्या संपर्काचा मुद्दा पक्षात चर्चिला जातो. पदाधिकाऱ्यांचेही फोन घेत नाहीत, असे पदाधिकारीच सांगतात. व्यवसायानिमित्त परदेशी दौºयावर असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांना सहज उपलब्ध होत नाहीत, अशी तक्रार आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMNSमनसेkalyan-rural-acकल्याण ग्रामीण