शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

"सकाळपर्यंत नाही म्हणाले अन् मतदानानंतर...."; महापौर चौधरींवर रवींद्र चव्हाणांचा संताप, कारवाईचा इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 14:36 IST

भिवंडीतील राजकीय भूकंपावर रवींद्र चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

Bhiwandi Mayor Election: महापौर निवडीवरुन भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेत आज मोठा राजकीय भूकंप झाला. भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे संतापलेल्या नारायण चौधरी यांनी पक्षादेश झुगारून बंडखोरी केली आणि चक्क काँग्रेस-राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) पाठिंब्यावर महापौरपदाची खुर्ची खेचून आणली. भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांचा दारूण पराभव झाला असून, त्यांना तिसऱ्या क्रमांकाच्या मतांवर समाधान मानावे लागले आहे. यानंतर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कारवाईचा इशारा दिला.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

भिवंडी महापालिकेच्या या निवडणुकीत सुरुवातीला भाजपने नारायण चौधरी यांचे नाव निश्चित केले होते. मात्र, ऐनवेळी चक्रे फिरली आणि स्नेहा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. पक्षाच्या निर्णयामुळे नाराज झालेल्या चौधरी यांनी तात्काळ भाजपमधील ६ नगरसेवकांसह भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना केली. सभागृहात झालेल्या हात वर करून मतदानाच्या प्रक्रियेत चौधरी यांनी विजयासाठी आवश्यक आकडा सहज पार केला. त्यांना मिळालेल्या ४८ मतांमध्ये खालील पक्षांचा समावेश होता:

दुसरीकडे, शिंदेसेनेने कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटील यांना पाठिंबा दिला, ज्यांना २५ मते मिळाली. भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांच्या पारड्यात केवळ १६ मते पडली.

भाजपने यापूर्वी चंद्रपूरमध्ये कमी संख्याबळ असतानाही ज्या प्रकारे आपला महापौर बसवला होता, त्याच खेळीचा वचपा काँग्रेसने भिवंडीत काढल्याची चर्चा आहे. भाजपने दिलेलाच उमेदवार फोडून, त्याला आपला पाठिंबा देऊन निवडून आणत काँग्रेसने भाजपला प्रत्युत्तर दिले. महत्त्वाचे म्हणजे, महायुतीत फूट पडल्याने भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढले, ज्याचा फायदाही बंडखोर गटाला झाला.

भाजपचा कारवाईचा इशारा

नारायण चौधरी यांच्या विजयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

"भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाबाबत काय करता येईल यासंदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरु होती. नारायण चौधरी यांना महापौर पदासाठी अर्ज भरण्यास सांगितले होते. कारण त्यांनी आम्हाला कळवलं होतं. पण नंतर तिथे अनेक घडामोडी घडल्या.  त्यामुळे स्नेहा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. काल संध्याकाळपासून ते सकाळपर्यंत नारायण चौधरी यांना असं करु नका म्हणून समजवण्याचा प्रयत्न केला होता. पक्षाच्या विरोधात गेलात तर तुमच्यावर कारवाई केली जाईल असे सांगितले होते. सकाळपर्यंत ते आम्ही बंडखोरी करणार नाही असं सांगत होते. तरी त्यांनी बंडखोरी केली. त्यामुळे ज्यांनी पक्षाचा व्हीप पाळला नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे," असं प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Rebellion in Bhiwandi mayoral election; Chavan warns of action.

Web Summary : Narayan Chaudhari rebelled in Bhiwandi mayoral election, winning with Congress-NCP support. BJP's candidate lost, leading to Ravindra Chavan's anger and warning of action against those who defied party orders after assurances to comply.
टॅग्स :Bhiwandi Nizampur Municipal Corporation Electionभिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Ravindra Chavanरविंद्र चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेस