प्रेयसी निघून गेल्याने पत्नीला पतीची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:22 IST2019-05-27T23:22:03+5:302019-05-27T23:22:06+5:30

पत्नीने विचारणा केल्यानंतर प्रेयसी निघून गेल्याने संतापलेल्या पतीने पत्नीला मारहाण केली.

Wife's husband beat | प्रेयसी निघून गेल्याने पत्नीला पतीची मारहाण

प्रेयसी निघून गेल्याने पत्नीला पतीची मारहाण

बदलापूर : पत्नीने विचारणा केल्यानंतर प्रेयसी निघून गेल्याने संतापलेल्या पतीने पत्नीला मारहाण केली. यात तिच्या करंगळीला फ्रॅक्चर केल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. हे दोघेही पतीपत्नी व्यवसायाने डॉक्टर आहेत.
बदलापूर पश्चिम भागातील रमेशवाडी भागात राहणारे हे ४४ वर्षीय डॉक्टर दाम्पत्य आहे. पतीचा बेलवली भागात, तर पत्नीचा सानेवाडी भागात दवाखाना आहे. ही डॉक्टर महिला दवाखान्यात रुग्णाला तपासत असताना पतीच्या दवाखान्यात त्याची प्रेयसी आल्याची माहिती तिला मिळाली. त्यानुसार, ही महिला पतीच्या दवाखान्यात पोहोचली. त्यावेळी तिच्या पतीची प्रेयसी पिशवीत कपडे घेऊन रत्नागिरीहून तिथे आली होती.
महिला डॉक्टरने याबाबत तिच्याकडे विचारणा केली असता उपचारासाठी आले असल्याचे सांगून लगेच ती निघून गेली. याचा राग आल्याने या महिलेच्या पतीने शिवीगाळ करत माझ्या बेडरूममध्ये यायचे नाही, असे सांगून तिचा हात पिरगळून पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत महिलेची करंगळी फ्रॅक्चर झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Wife's husband beat