पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला अटक

By Admin | Updated: May 11, 2017 01:38 IST2017-05-11T01:38:23+5:302017-05-11T01:38:23+5:30

ओढणीने नवऱ्याचा गळा आवळून त्याची हत्या करून, पुरावा नष्ट करण्यासाठी नंतर ओढणीचे तुकडे करून ते कचऱ्यात फेकणाऱ्या पत्नीला

The wife who murdered her husband was arrested | पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला अटक

पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्रा : ओढणीने नवऱ्याचा गळा आवळून त्याची हत्या करून, पुरावा नष्ट करण्यासाठी नंतर ओढणीचे तुकडे करून ते कचऱ्यात फेकणाऱ्या पत्नीला सहा दिवसांनी मुंब्रा पोलिसांनी अटक केली. अलमास कॉलनी भागातील बी. एम. अपार्टमेन्टमध्ये रहाणारा मेहंदी सैय्यद याचा झोपेतच मृत्यू झाल्याचा कांगावा करून पत्नी जहीरा हिने त्याला खाजगी रु ग्णालयात नेले. नंतर दफनविधीपूर्वी कब्रस्तानात मृतदेहाला अंघोळ घालण्याची तयारी सुरु असताना गळ्याजवळील खुणा व्यवस्थापकाच्या लक्षात आल्या. त्याच्या सांगण्यावरु न नातेवाईकांनी पोलिसांना बोलावून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविला. तपासणीअंती त्याचा खून झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. त्याआधारे व नातेवाईकांच्या तक्रारीनुसार जहीरा हिला अटक केली.

Web Title: The wife who murdered her husband was arrested