शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

गुढीपाडव्याच्या दिवशीच संशयावरून पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 6:20 AM

उल्हासनगरातील घटना : पतीला अटक, मुलीसमोरच गळा दाबून घेतला जीव

उल्हासनगर : अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना उल्हासनगरात शनिवारी, ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी घडली. हे हत्याकांड १३ वर्षांच्या मुलीसमोर घडले असून, तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम बापाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

उल्हासनगर, कॅम्प नं.-१ मध्ये मुकुंदनगर येथे प्लंबरचे काम करणारा दीपक पगारे हा पत्नी आणि मुलीसोबत वास्तव्याला आहे. घरी आर्थिक ओढाताण होऊ नये, म्हणून रेखा धुण्याभांड्याचे काम करत होती. त्यांना प्रतीक्षा नावाची १३ वर्षांची मुलगीही आहे.काही दिवसांपासून पत्नीच्या अनैतिक संबंधांविषयी दीपकला संशय होता. त्यामुळे त्यांच्यात भांडणेही व्हायची. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता रेखा घरी आल्यानंतर पुन्हा दोघांत भांडणे झाली.

यावेळी दीपकने रागाच्या भरात पत्नीचा गळा आवळून खून केला. हा सर्व प्रकार घरात असलेल्या प्रतीक्षासमोर झाला. याघटनेनंतर दीपकने घरातून पळ काढला.

ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी घडलेल्या या खुनाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. मुलीच्या तक्र ारीवरून दीपकविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून, त्याला रात्रीच अटक केली.

टॅग्स :Murderखून