शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मराठी नाटक निर्माता - दिग्दर्शक यांची लता मंगेशकर नाट्यगृहाकडे पाठ कशाला? नाट्य रसिकांचा सवाल 

By धीरज परब | Updated: November 20, 2023 15:40 IST

असा सवाल नाट्य रसिक करत आहेत . 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - प्रायोजित नाट्य महोत्सवात गाजलेल्या आणि दिग्गज कलाकारांच्या नाटकांचे प्रयोग लता मंगेशकर नाट्यगृहात होऊ शकतात तर मग  तांत्रिक करणे पुढे करून मराठी नाटक निर्माता - दिग्दर्शक यांची लता मंगेशकर नाट्यगृहा कडे पाठ कशाला ? असा सवाल नाट्य रसिक करत आहेत . 

मीरारोडच्या शिवार तलाव जवळ असलेले नाट्यगृहाचे एकमेव आरक्षण संगनमत व नियमबाह्यपणे एका वादग्रस्त विकासकाच्या घशात घालण्याचा प्रकार केल्याने शहरातील नागरिकांना नाट्यगृह मिळण्याचे मार्ग बंद झाले होते . मात्र आमदार प्रताप सरनाईक यांनी गेल्या अनेकवर्षां पासून सातत्याने पाठपुरावा करत होते . नाट्यगृहाच्या कामात विविध प्रकारे खो घालण्याचा प्रयत्न तत्कालीन पालिकेतील सत्ताधारी भाजपाने बहुमताच्या बळावर चालवला . निधी दिला नाही . मात्र शासना कडून मंजुऱ्या घेऊन काशीमीरा येथे आलिशान नाट्यगृह , आर्ट गॅलरी आ . सरनाईक यांनी उभारून घेतली .  ११ ऑक्टोबर २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहाचे लोकार्पण केले . 

नाट्यगृह उभारताना आ . सरनाईक यांनी नाट्य निर्माते , दिग्दर्शक , कलाकार आदींना पाचारण करून नाट्यगृहात आवश्यक त्या गोष्टींसाठी त्यांच्या सूचना घेऊन काम पूर्ण केले होते . संपूर्ण वातानुकूलित चार  मजली इमारतीत एक मोठे तर एक छोटे नाट्यगृह, २ आर्ट गॅलरी, बेसमेंट मध्ये व तळमजल्यावर वाहन पार्किंग या शिवाय वेटिंग हॉल , कॅफेटेरिया , व्हीआयपी रूम , ग्रीन रुम , ६ लिफ्ट, चांगली आसन व्यवस्था,  आधुनिक पद्धतीची ध्वनी यंत्रणा व प्रकाश व्यवस्था येथे केली गेली . त्यामुळे शहरातील नाट्यरसिक ह्या नाट्यगृहात नाटकाची तिसरी घंटा वाजण्याच्या प्रतीक्षेत होते . 

मात्र  १३ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोजित ३८ कृष्ण विला हा पहिलाच नाट्य प्रयोग त्यावेळी साउंड सिस्टीम आदी तांत्रिक त्रुटींची करणे देऊन निर्मात्याने रद्द केला होता . विशेष म्हणजे ह्या दरम्यान गुजराती, मल्याळी आदी अन्य भाषिक नाटकांचे प्रयोग होत असताना मराठी नाटके मात्र  होत नसल्याने रसिक नाराज झाले होते . दरम्यान तांत्रिक त्रुटी नेमक्या काय होत आहेत हे समजून त्या दुरुस्त केल्या गेल्या . तब्बल १० महिन्यांनी म्हणजेच विवार ६ ऑगस्ट २०२३ रोजी करून गेलो गाव ह्या पहिल्या मराठी नाटकाचा तोही हाऊसफुल्ल प्रयोग झाला . 

दिवाळीच्या निमित्ताने आ . सरनाईक यांनी  नाट्यमहोत्सवाचे आयोजन करून 'एका लग्नाची पुढची गोष्ट ', ' तू तू मी मी' ,  'तू म्हणशील तसं' व  'देवबाभळी ' ह्या गाजलेल्या आणि दिग्गज कलाकार असलेल्या नाटकांचे प्रयोग झाले . शिवाय रसिकांनी देखील हाऊसफुल्ल प्रतिसाद दिला . हि गाजलेली नाटके ह्या नाट्यगृहात सुरळीत झाली असताना नियमित मराठी नाटके होत नसल्या बद्दल नाट्यरसिकांनी नाराजी व्यक्त केली .  मराठी नाट्य चळवळ सर्वत्र पसरली पाहिजे , नाटकांचे प्रयोग मीरा भाईंदर सारख्या मोठ्या शहरात सुद्धा नियमित झाले पाहिजेत . नाट्यकला जोपासण्या ऐवजी फक्त व्यावसायिक आर्थिक गणितांची आकडेमोड मराठी नाट्यसंस्था , निर्माते यांनी करणे योग्य नसल्याचे नाट्यरसिकांनी बोलून दाखवले . 

बाळकृष्ण तेंडुलकर ( नाट्य व कला रसिक ) - इतके आलिशान सुसज्ज नाट्यगृह शहरात झाले असताना व्यावसायिक नाट्य निर्माता व दिग्दर्शक यांनी नाट्य प्रयोग न लावणे हे नाट्यकला व नाट्यरसिकांचे दुर्दैव म्हणावे लागेल . केवळ आर्थिक फायद्याचा विचार न करता नवीन नाट्यगृहात चांगल्या दर्जेदार नाटकांच्या प्रयोगास त्यांनी प्राधान्य दिले पाहिजे . 

मिलींद रकवी ( नाट्य रसिक ) - मीरा भाईंदर मध्ये नाट्य कला रसिक मोठ्या प्रमाणात आहेत . आजही गावा गावात स्थानिक कलालकर नाटकांचे आयोजन करतात . पूर्वी परळ - दादर ला नाटक बघण्यास जावे लागायचे पण शहरात इतके सुसज्ज नाट्यगृह होऊन देखील मराठी नाटकांचे प्रयोग जर नाट्यसंस्था , निर्माते आयोजित करत नसतील तर चुकीचे आहे . उलट त्यांनी नवीन नाट्यगृहास प्रोत्साहन व प्राधान्य दिले पाहिजे . महापालिकेने सुद्धा मराठी नाटकांना सवलतीने भाडे आकारावे . 

टॅग्स :Natakनाटक