कर्जत नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची वर्णी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 23:42 IST2021-04-26T23:41:55+5:302021-04-26T23:42:05+5:30
आज होणार निवडणूक : धनंजय दुर्गे यांनी दिला राजीनामा

कर्जत नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची वर्णी?
कर्जत : कर्जत नगरपरिषदेमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वीकृत नगरसेवक धनंजय दुर्गे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने उद्या दि.२७ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडीत त्यांच्या जागी स्वीकृत नगरसेवक म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे कर्जतकरांचे लक्ष लागले आहे.
कर्जत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया २८ जानेवारी २०१९ रोजी पूर्ण झाली होती. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीच्या सुवर्णा जोशी निवडून आल्या आहेत. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या नगरपरिषदेच्या पहिल्या विशेष सभेत उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे अशोक ओसवाल यांची वर्णी लागली होती तर स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेनेचे संकेत भासे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धनंजय दुर्गे यांची वर्णी लागली होती.
जानेवारीमध्ये पार पडलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना -भाजपा-आरपीआय महायुतीच्या थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा जोशी विजयी झाल्या होत्या. महायुतीचे दहा नगरसेवक निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस मनसे-शिवराय भीमराय क्रांती संघटना महा आघाडीला आठ जागा मिळाल्या आहेत. दहा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेली सत्ता मिळवण्यात महायुतीला यश आले.
नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दि.२७ फेब्रुवारी रोजी उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन केले होते. सत्तेत बसलेली महायुती मध्ये शिवसेना - भाजपा -आरपीआय हे तीन पक्ष आहेत. पहिले उपनगराध्यक्षपदाचा मान भाजपचे अशोक ओसवाल यांना मिळाला होता.