शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

ठाण्याचा ‘ठाणे’दार ठरेल कोण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व पणाला

By अजित मांडके | Updated: May 13, 2024 08:33 IST

ही लढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील आहे. ठाण्यातील निकाल महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणार असेल.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे लोकसभेत यंदा प्रथमच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. उद्धव सेनेकडून विद्यमान खासदार राजन विचारे तर शिंदे सेनेकडून शिंदे यांचे निष्ठावान माजी महापौर नरेश म्हस्के हे निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. ही लढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील आहे. ठाण्यातील निकाल महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणार असेल.

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे तो शिंदे की ठाकरे यांच्यापैकी कोण सर करणार, हे पाहणे महत्वाचे आहे. विचारे व म्हस्के हे दोघेही स्व. आनंद दिघे यांचे शिष्य असल्याने खरा शिष्य कोण, हेही ठाणेकर नक्की करणार आहे.  उद्धव सेनेची साथ सोडून म्हस्के शिंदे यांच्यासोबत गेले. स्वीकृत नगरसेवक, सभागृह नेते, स्थायी समिती सभापती, महापौर व आता शिंदे सेनेचे प्रवक्ते असा म्हस्के यांचा प्रवास आहे. तर उद्धव सेनेने  राजन विचारे यांना सलग तिसऱ्यांदा संधी दिली आहे.  

गाजत असलेले मुद्दे

आनंद दिघे यांचा खरा शिष्य कोण? ठाण्याचा गड कोण राखणार? निष्ठावंत की गद्दार? खासदार लोकांच्या संपर्कात होते का? भाजपमधील नाराजांची भूमिका काय?

नाराजीचा सूर

शिंदे सेनेकडून नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईत आणि मीरा-भाईंदरमध्ये नाराजीचा सूर उमटला. गणेश नाईक कुटुंबीयांची नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बैठक घ्यावी लागली. त्यानंतर नाराजी दूर झाल्याचे नाईक यांनी जाहीर केले असले तरी दिल्लीतून नेत्यांना ठाण्यात पाठवले जाणार आहे. 

नेत्यांची भूमिका महत्त्वाची 

भाजपच्या गणेश नाईक यांची भूमिका महत्वाची आहे. नवी मुंबईतून म्हस्के यांना किती मताधिक्य मिळते, त्यावर त्यांचे विजयाचे गणित अवलंबून आहे. मुख्यमंत्री शिंदे हे ठाण्याकडे अधिक लक्ष देऊन आहेत. विचारे यांच्या प्रचारासाठी सुषमा अंधारे मैदानात उतरल्या आहेत.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

ठाण्याला अद्यापही हक्काचे धरण उपलब्ध होऊ शकलेले नाही. मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूककोंडी केव्हा सुटणार. जलवाहतुकीचे भिजत पडलेले घोंगडे. नवीन ठाणे स्टेशनचे काम केव्हा पूर्ण होणार. पाण्याची समस्या आजही सुटू शकलेली नाही.

२०१९ मध्ये काय घडले ?

राजन विचारे            शिवसेना (विजयी)    ७,४०,९६९आनंद परांजपे         राष्ट्रवादी काँग्रेस    ३,२८,८२४

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी ?

वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष     टक्के२०१४    राजन विचारे    शिवसेना    २८.७२२००९    संजीव नाईक    राष्ट्रवादी     ४०.१४२००४    प्रकाश परांजपे    शिवसेना     ४८.०८१९९९    प्रकाश परांजपे    शिवसेना     ४३.२२१९९८    प्रकाश परांजपे    शिवसेना     ५९.२१ 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४thane-pcठाणेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४